थोडा है थोडे की जरुरत है @ 16.04.19
नव मतदार माझ्या पोरीने तिच्या समुहामधे झालेल्या चर्चेनंतर मला विचारलेल्या प्रश्नांमुळे एका बाजुने मला फार आनंद झाला व दुसऱ्या बाजूने कधीकधी आपले मत एखाद्या बाबतीत फारच टोकाचे होऊन जाते याबाबत जरासा खेदही वाटला . अर्थात सातत्याने आपल्याला येत असलेल्या अनुभवांमुळेही आपण कधी कधी काही मते बनवितो . ती एक स्वाभाविक प्रक्रीया आहे . परंतू आता नव्या काळात या मते तयार होण्याच्या प्रक्रीयेसोबत आपण एका गोष्टीची जोड द्यायला हवी असे मात्र मला माझ्या पोरीचे प्रश्न वाचून मनापासून जाणविले . जीवन जगत असताना आपल्याला अनुभव येतात , त्यावरुन आपले एक मत तयार होते व केवळ तेच मत योग्य आहे असा काहीसा दुराग्रही विचारही त्यासोबतच तयार होतो . हा विचार बदलण्याची तयारी आता आपल्याला ठेवावी लागणार आहे . मत तयार होणे ही जशी स्वाभाविक प्रक्रीया आहे त्याप्रमाणे ते मत वेळ पडल्यास सहजतेने बदलण्याची मानसिकता आता उपयोगाची आहे . याचे महत्वाचे कारण बदलांचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे . त्य...