थोडा है थोडे की जरुरत है @ 12.02.19
त्याला आनंद होईल म्हणून .. मला हे अजिबात पटत नाही . माझे मत याबाबत अतिशय ठाम आहे . श्रद्धा असणे ठीक आहे परंतू त्या श्रद्धांचे अश्या पद्धतीने सादरीकरण मला मान्य नाही . या सर्व गोष्टींमुळेच आपला धर्म बदनाम होतो . अकारण देवाच्या भोवती निर्माण केलेली ही अंधश्रद्धेची वलयं नव्या काळात थोतांड वाटू लागतात आणि मग लोक देवाच्या पवित्र भावनेशी जोडण्यापेक्षा त्यापासून दूर जाऊ लागतात . आजपासून साधारण सतरा अठरा वर्षापूर्वी शिमल्याला एका उद्बोधन वर्गाकरीता गेलो असता त्या वर्गातील एका देबोजीत नावाच्या बंगाली मित्रासोबत मी तावातावाने श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर वाद घालताना हे सारे बोलत होतो . त्या चर्चेमधे मी त्याला पुढे म्हणालो होतो की श्रद्धा असावीच कारण या सबंध विश्वाला संचालित करणारी एक अतर्क्य आणि असीम शक्ती कार्यरत आहे जी उर्जेच्या स्वरुपात कार्य करते . परंतू त्या शक्तीला आपल्याला प्रत्यक्ष बघता येत नाही म्हणून त्याची वेगवेगळी रुपे परमेश्वर या संकल्पनेतून आपल्यास...