Posts

Showing posts with the label एक मजेदार जपणूक

थोडा है थोडे की जरूरत है @21.11.17

Image
एक मजेदार जपणूक काल दुपारी मी फोन केला तेव्हा काय करत होतीस ? किती वेळा फोन लावला .. मी माझ्या मैत्रीणीला विचारले . तिने जे उत्तर दिले ते ऐकून मला आजच्या काळात हरवत चाललेली एक गोष्ट निदान तिने जपलीय याचा आनंद झाला .. नवा काळ सुरु झाला आणि आपले जीवन आमुलाग्र बदलून गेले . तंत्रज्ञान आपल्या जीवनात आले आणि त्यामुळे आपण सारे एकमेकांच्या जवळ आल्याचा आभास निर्माण झाला . या नव्या जगात झालेल्या अनेक बदलांपैकी एक अतिशय महत्वाचा बदल झाला तो म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनाला एक प्रकारचा वेग निर्माण झाला . या वेगामुळे आपण धावू लागलो . धावता धावता आपल्याला त्या धावण्यात आनंद मिळू लागला कारण त्या धावण्याची काही चांगली फळे आपल्याला मिळू लागली . परंतू नंतर आपल्या लक्षात येऊ लागले की या फलप्राप्तीच्या नादात काही त्याही पेक्षा मुल्यवान गोष्टी आपल्या आयुष्यातून जवळपास हद्दपार झालेल्या आहेत . हे आपल्याला कळले तरी देखील या नव्या जगात धावण्याची जी सवय आपल्याला झालीय त्यामुळे ...