Posts

Showing posts with the label शेरनी

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

Image
शेरनी ॲमेझॉन प्राईम या ॲपवर नुकताच एक नवा सिनेमा प्रदर्शित झाला . सध्या कोरोना काळामुळे या मोबाईल ॲप्सवर खूप सारे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत . हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत यामधे सहभागी होत असल्याने या सर्व वेब सिरीज अतिशय जास्त लोकप्रीय झालेल्या आहेत . फक्त भारतात नाही तर संपुर्ण जगात या वेब सिरीज अतिशय लोकप्रीय आहेत . वेब सिरीज सोबतच आता या ॲपवर चित्रपट देखील प्रदर्शित होऊ लागलेत . अनेक कसदार नट नट्यांची ओळख देखील लोकांना या निमीत्ताने होते आहे . शेरनी या चित्रपटात तर अत्यंत प्रतिभावान नटी विद्या बालन हिने काम केले असल्याने या चित्रपटाबद्दल कुतुहल होतेच . मी स्वतः या चित्रपटाबद्दल फारच उत्सुक होतो कारण या चित्रपटाच्या संकल्पनेमागे माझा एक अत्यंत घनिष्ठ मित्र होता . त्यामुळे मी हा चित्रपट बघताना अतिशय शांतपणे बघण्याचे ठरविले . चित्रपट सुरु झाला आणि अगदी सुरुवातीलाच ज्या काही महत्वाच्या लोकांचे धन्यवाद मानण्यात आले आहे त्यात मला माझ्या...