थोडा है थोडे की जरूरत है @10.10.17
हसरी व्यथा अनेक वर्षांनी तो आपल्या मैत्रीणीला भेटत होता . शाळा संपल्यावर पहिल्यांदाच . परंतू गेल्या काही वर्षांपासून त्याचा तिच्यासोबत व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संवाद सुरु झाला होता . एकमेकांशी बोलता बोलता जुना मैत्रीचा बंध पुन्हा निर्माण झाला होता . अमेरीकेत राहणारा तो त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी तिच्या गावाला आला . बालपणीची मैत्री असल्यामुळे त्यांच्यातील संवाद हा व्यक्तिगत स्वरुपावर लगेच आला . हिने आपल्या आयुष्याबद्दल त्याला सांगितले , परीवाराबद्दल सांगितले . त्यानंतर तो सांगू लागला . अमेरीकेत राहणारा , खूप छान नोकरी असलेला , एकुलती एक लेक , चांगली सांपत्तिक स्थिती असा सगळा त्याचा भाग तिच्या डोक्यात असल्याने त्याच्या आयुष्याबद्दलचे एक चित्र तिच्या डोक्यात तयार होते . त्यामुळे आता त्याचे कसे छान सुरु आहे असे ऐकायला मिळणार या अपेक्षेने ती ऐकू लागली . व्हॉट्स अॅपवरील बोलण्यावरुन किंवा मित्र मैत्रीणींच्या ग्रुपमधे तरी त्याच्या बोलण्यावरुन तिला तसेच जाणविले होते . परंतू तिच्या...