Posts

Showing posts from August, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
जीवनाची वाढलेली (पण न कळणारी) किंमत "सध्याचे हे सारे जे सुरु आहे ना याबद्दल मला विचाराल तर थोडक्यात मी याचा उलगडा करुन देते... झालं असं आहे की सध्या प्रत्येक माणसाच्या जीवनाची किंमत वाढली आहे आणि सोबतच ती त्याला जाणवायलाही लागली आहे. शिक्षणामुळे, बदलत्या वातावरणामुळे, रोज नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधींमुळे प्रत्येकाला आपल्यातल्या स्वतः ला भेटण्याची संधी मिळते, त्या निमित्ताने आपल्या स्वतःला काय आवडते काय नावडते याबद्दल विचार करता येतो व त्यानुसार जीवनाची दिशा ठरविण्याची मुभा असल्याने हा सगळा स्वतंत्रतेचा आविष्कार बघायला मिळतो. आपल्याच जीवनाची किंमत वाढलेली जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्या किंमतीनुसार माणूस वागणे सुरु करतो, ती किंमत जपण्याचाही प्रयत्न करतो आणि वारंवार ती किंमत इतरांच्या मनावर वेगवेगळ्या उपाययोजनांनी ठसविण्याचाही प्रयत्न करतो. आता या सगळ्या प्रकारात गंमत अशी आहे की एका बाजूने माणसाला माणसाची किंमत कळणे व त्यानुसार त्याच्या जीवनाची वाटचाल होणे या दोन्ही बाबी सत्यतेच्या निकषावर एकमेकांना पुरक ठरु शकतात व चांगल्या प्रकरची स्वाभीमानी व्यक्तिमत्वे तयार झालेली आपल्या

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
वाय + झेड = वायझेड माझं वय असं आहे की ना धड मला स्वतःला तरुण म्हणविता येत ना धड मध्यवयीन. तरुण म्हणावे तर तरुण लोक करतात त्या गोष्टी मला आगाऊपणाच्या व वाह्यातपणा वाटतात. पण मग सरळ मध्यमवयीन हे बिरुद देखील स्विकारायला मन धजावत नाही कारण एखादी वीशीतली पोरगी काका म्हणते तेव्हा मनात वेदना होतात. काका म्हणण्यापेक्षा लादेन किंवा दाऊद म्हणले तरी चालेल असे त्या पोरीला म्हणावे वाटते. माझं अद्याप लग्न झालेले नाही, लग्न करण्याची इच्छा तर आहे पण मी लग्नासाठी परफेक्ट मटेरीयल नाही असे मला वाटायला लागले आहे. मी नक्की काय करतोय किंवा मला काय करायचंय हेच मला कळत नाहीये.... वायझेड या नव्या मराठी चित्रपटातील तेहेतीस वर्षांचा नायक स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सांगत असतो. हा नायक स्वतः वाय जनरेशनचा सदस्य आहे. वाय जनरेशन म्हणजे साधारण १९७१ ते १९९५ दरम्यान जन्म झालेली पिढी. या पिढीचे, तिच्या मानसिकतेचे व तिच्या स्वभावगुणांचे हा नायक प्रतिनिधित्व करीत असतो. संपुर्णपणे गोंधळून गेलेला. मोठ्या वयाच्या मित्रांमधे जाण्यास टाळणारा व तरुणांच्या म्हणजेच झेड जनरेशनच्या वेगात भांबावून जाणारा असा हा वाय जनरेशन

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
पोटचा गोळा तब्बल चार वर्षांनंतर सुनिलच्या घरात बाळाची चाहुल लागली. घरात येणाऱ्या बाळाच्या लडीवाळ अस्तित्वाच्या स्वप्नांनी सुनिल व त्याच्या पत्नीचे जग व्यापून गेले. अपत्य नसल्याने गेली चार वर्षे त्या दोघांचे क्षणाक्षणाला वाढत जाणारे दुःख आम्हा सर्वांनाच जाणवित होते. वहिनी तर जणू हसणेच विसरली होती. मातृत्व ही स्त्रीची सर्वात मोठी ओळख असते व त्यामुळेच तिला पुर्णत्व प्राप्त होते अश्या विचारांना उराशी बाळगणारी ती असल्याने आपण अपूर्णच आहोत अशी तिला सारखी टोचणी लागलेली असायची. बाळ दत्तक घेऊनही मातृत्व चांगल्या प्रकारे निभावता येतं हे तिच्या शिक्षित बुद्धीमत्तेला पटत होते परंतू त्याने तिच्या भावनिक मनोभुमिकेची समजूत घातली जात नव्हती. वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस् घेतल्यानंतर मात्र जेव्हा तिला तिच्या पोटच्या गोळ्याची चाहूल लागली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या बाळाच्या केवळ आगमनाच्या चाहुलीने सुनिल व वहिनीचे जगच बदलून गेले. डॉक्टरांनी जितकी काळजी घ्यायला सांगितली त्यापेक्षा जवळपास दहापट जास्त तिची स्वतःची काळजी घेणे सुरु झाले. सुनिलचे देखील तिच्याकडे पूर्ण लक्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
स्वच्छ व पारदर्शी दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या एका महाविद्यालयामधे मला प्राध्यापक पदाच्या मुलाखती घेण्यासाठी विषयतज्ञ म्हणून बोलाविण्यात आले होते. उच्चशिक्षण प्रक्रीयेमधे मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांपैकी हे एक महाविद्यालय आहे. मला त्या महाविद्यालयात विषयतज्ञ म्हणून मुलाखतींकरीता जाण्याची बरेच वेळा संधी मिळाली. प्रत्येकवेळी मला तेथे जाणविलेली स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीया मनाला सुखावून जाते. दोन वर्षापूर्वी एका प्रक्रीयेत सहभागी झाल्याचे व त्यावेळी केलेल्या कर्तव्याचे फलीत मला नुकतेच अनुभवायला मिळाले. मी सहभागी झालेल्या प्रक्रीयेचा दोन वर्षांनतरचा परीणाम माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला फारच आनंद व समाधान देणारा होता. त्या आनंदाला कारणीभूत ठरलेली त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडमने नुकतीच दिलेली उत्स्फुर्त प्रतिक्रीया फारच मोलाची होती. चांगले काम केल्याची अशी पावती आपल्याला बरेचवेळा आणखी चांगले कार्य करण्याची नवी उमेद देऊन जाते. मला माझ्या छोट्याश्या परंतू प्रमाणिकपणे केलेल्या कामाचा आनंद तर होत होताच परंतू ती प्रक्रीया राबविणाऱ्