Posts

Showing posts from 2018

थोडा है थोडे की जरुरत है @01.01.19

Image
विश्वास ट्रेकच्या तयारीसाठी रुट मार्क करायला जायचे होते . राष्ट्रीय कॅम्पचे आयोजन केले असल्याने नवे काही रुट शोधण्याचे बैठकीत ठरले . नवे रुट म्हणजे जंगलात जाऊन रुट मार्कींग करणे आले . कोण कोण तयार होणार याबाबत विचारणा करण्यात आली . अनेक उत्साही कार्यकर्ते होते त्यापैकी पाच जण तयार झाले . प्रविण , सुनिल , निरज , प्रसन्न आणि मंजिरी . होय मंजिरी . चार मुलांसोबत एकटी मुलगी . या बाबीचा असा उल्लेख केल्यावर अजुनही सहजच भुवया वर जातात . परंतू या पाच जणांची ही टीम आणि त्या टीमसोबत घडलेला प्रसंग ऐकल्यावर शंकेने वर जाणाऱ्या भुवया कौतुकाने वर जातील . सर्वात महत्वाचे म्हणजे आजपासून साधारण तीस वर्षांपूर्वीच्या सामाजिक वातावरणातील ही घटना मी आपणाला सांगतोय . चार मुले आणि एकच मुलगी रुट मार्कींगला जाणार आहेत हे समाजाच्या दृष्टीने जरी प्रश्नार्थक चिन्ह लावणारे वाक्य असले तरी देखील आमच्या समुहाकरीता मात्र पाच जण रुट मार्कींगसाठी जाणार आहेत हे पुर्णविराम असलेले वाक्य होते . परंतू असे