Posts

Showing posts from August, 2015

दै. हिन्दुस्थानमधे प्रकाशित माझ्या "थोडा है थोडे की जरूरत है" या सदरा अंतर्गत प्रकाशित लेख

ह्रायनोसॉरस व्हायचे की?.... साधारण  महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे. नागपूरला एका रस्त्याहून मी गाडी चालवित निघालो होतो. गाडीचा वेग फार ठेवला नव्हता कारण रस्ता माझ्यासाठी नविन होता. रस्त्यात काही काही सिग्नल लागले. आणखी पुढे गेल्यावर परत एक सिग्नल लागला आणि मी माझी गाडी थांबविली. सिग्नलवर लाल दिवा लागला होता. नियमानुसार मी गाडी थांबविली. काही क्षणातच माझ्या लक्षात आले की दुचाकी वाहने सिग्नल लाल असतानाही मला ओलांडून पुढे निघुन जात होती व त्याचे वाहक माझ्याकडे वळून आश्चर्यकारक नजरेने बघत होते. दुचाकी वाहन चालविणारे बरेच वेळा अश्याच गाड्या कुठुनही काढतात म्हणून मी दुर्लक्ष केले. त्याच वेळी माझ्या गाडी मागे एक कार येऊन उभी राहीली. त्याला कदाचित उजवीकडे जायचे होते म्हणून त्याच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविणे सुरु केले. मला कळेना की सिग्नल लाल असताना हा उगाचच हॉर्न का वाजवितो आहे. मला त्याचा रागच आला. मी पुढे जात नाही बघून त्याने गाडी माझ्या गाडीच्या बाजूने समोर घेतली व माझ्या गाडीच्या रांगेत आणून तो ड्रायव्हर मला म्हणला, भाईसाहब क्युँ खडे हो, आगे बढो यार। मी त्याला म्हणालो, कैसे बढूँ, सिग्नल बंद

दै. हिन्दुस्थान मधे प्रकाशित माझ्या थोडा है थोडे की जरूरत है या सदरातील दि. १८.०८.१५ चा लेख

संस्कारांचे भाग्य आपल्या भारतीय कुटुंबांमधे एका पिढीने पुढच्या पिढीवर संस्कार करण्याची पद्धत फार जुनी आहे. संस्कार हे परंपरागत पद्धतीने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत देण्याची पद्धत होती व त्यामुळेच ते टिकूनही राहीले. मुळात संस्कार ही एक प्रक्रीया आहे ज्या द्वारे नव्या पिढीला सामाजिक दृष्टीने जगण्याचे नियम घरातील मंडळींकडूनच शिकविले जातात. त्यामुळे जेथे कुटुंब आहे तेथे संस्कार असणारच असे सूत्र आपल्याला बघायला मिळाले. नाही म्हणायला संस्कार शिबिरांची संकल्पना निर्माण झालीच. परंतू ढोबळमानाने संस्कार जपल्या गेले व त्याचे पालन देखील प्रत्येक काळामधे नव्या पिढीने प्रामाणिकपणे केले. परंतू नव्या शतकात मात्र या संस्कारांच्या अनुपालनाबाबत काही अडचणी निर्माण झाल्या. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, संस्कार रुजविण्यासाठी आवश्यक असलेल्या आजी आजोबांची घरातील अनुपस्थिती, कामाच्या राम रगाड्यात वेळेची संपलेली उपलब्धता या सर्व बाबींनी संस्कार रुजविण्याच्या प्रक्रीयेला जरा खिळ बसली. याशिवाय ज्यांच्यावर संस्कार केले जाणार आहेत त्यांच्यावर इतर बाबींचा वाढलेला प्रभाव हा देखील संस्कारांच्या जपणूकीमधे अडसर

दै. हिन्दुस्थान मधील सदर "थोडा है थोडे की जरूरत है" या सदरात प्रकाशित लेख

प्रोफेशनल हझार्डस् एका मोठ्या विभागाचा एक मोठा अधिकारी एकदा सहज वेळ होता म्हणून आपल्या कामाच्या व्यापाचे वर्णन करीत होता. तो म्हणाला - आज मला येथे येण्यास थोडा उशीर झाला कारण घरी पत्नीने जेवण करुन जाण्याचा आग्रह धरला. मी तिला म्हणालो की तेथे मुलाखती आटोपल्यावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली असणारच. परंतू तिनेच मला आठवण करुन दिली की मी गेल्या पाच दिवसांपासून घरी जेवलेलोच नाही. गेले पाच दिवस मी सारखा पळतोय. कधी मुंबईला मिटींग, कधी पुण्याला, कधी हायकोर्टात नागपूरला तारीख तर कधी येथेच माझ्या कार्यालयात महत्वाची माहिती पाठवायची म्हणून रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम. इतक्या उशीरा कर्मचारी मंडळींना थांबवायचे म्हणजे त्यांच्या जेवणाची सोय करणे आलेच. मग त्यांना बरे वाटावे व त्यांचा धीर वाढाविण्यासाठी त्यांच्यासोबत जेवण. नागपूरला हायकोर्टात गेलो की तर विचारु नका. तेथे तर क्लर्क पासून तो अधिकारी सर्व काही मीच असतो. दोन दोन केसेस असतात. भल्या पहाटे येथील कार्यालयातील कामे आटोपून निघायचे, न्यायमूर्तींसमोर अजिबात वेळ होता कामा नये या सरकारी वकीलांनी दिलेल्या सूचना डोक्यात ठेऊन जेवणाचा विचारही न करता क