Posts

Showing posts with the label कार्यसिद्धीआनंद(?)

थोडा है थोडे की जरुरत है @ 09.04.19

कार्यसिद्धीआनंद (?) आजच्या लेखाच्या शिर्षकासमोर लावलेले प्रश्नचिन्ह वाचकांना जरा बुचकळ्यात टाकणारे ठरेल . परंतू त्याचा उलगडा या लेखाच्या शेवटी होईल .  तर , माझ्या त्या बहिणीच्या मदतीसाठी आम्ही सारे सज्ज झालो . वेळेची मर्यादा मी सर्वांना सांगितली होती . सायंकाळी ८ वाजता बदल केलेल्या कादगपत्रासह तिला विदर्भ एक्सप्रेसमधे आरक्षणासह बसवायचे होते . सगळ्यात पहिल्यांदा मी आमच्या गरीब विद्यार्थ्यांकरीता सुरक्षित असलेल्या फंडातून काही रक्कम तिच्या नावाने देण्यास सांगितली . कारण तिला पैश्यांची गरज होती . संबंधित प्राध्यापकांनी तिच्या नावाचा चेक तयार केला व तो चेक स्वतःची बँकेतील ओळख वापरुन वटवून आणला . तोवर तिच्याकडून वेगवेगळी आवेदनपत्रे लिहून घेण्याचे काम एका प्राध्यापकाने केले . तिच्या शाळेतून व कनिष्ठ महाविद्यालयातून तिच्या नावाचे प्रमाणपत्र बनवून आणले तिच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काढून दिल्या व त्यानंतर ती माझ्या एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या गाडीवर बसून...