Posts

Showing posts from March, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @02.04.19

कार्यसिद्धीप्रयास रडत रडत ती विद्यार्थिनी माझ्याकडे आली . कुणीतरी रागावले असणार किंवा काम होऊ शकत नाही असे म्हणले असणार असे मला नेहेमीच्या अनुभवावरुन वाटले . बरेच वेळा विद्यार्थिनींना तुमचा मी मोठा भाऊ आहे असे सांगितलेले असल्याने व त्याच भावनेतून वागणूक ठेवल्यामुळे माझ्याकडे येऊन समस्या मांडताना त्यांना सहजता वाटते . त्यामुळे दिवसभरात अश्या छोट्या छोट्या समस्या बऱ्याच सोडविल्या जातात . त्या दिवशी देखील तोच प्रकार असावा असे मला वाटले . फी भरायला पैसे नाहीत , स्कॉलरशीपचा फॉर्म भरता आला नाही , बाबा फीचे पैसे देत नाही म्हणतात , परीक्षेचा फॉर्म भरलाच नाही , मॅडम प्रॅक्टीकल रेकॉर्ड घेत नाहीत , मी वर्षभर कॉलेजला आलीच नाही त्यामुळे परीक्षा दिल्याच नाही , मला गॅदरींगमधे डान्स करायचा आहे पण सर म्हणतात की ऑडीशन होऊन गेले आता काही करता येणार नाही या सारख्या छोट्या छोट्या तक्रारींपासून तो मी आई बाबांचा विरोध न जुमानता पळून जाऊन लग्न केले आहे व मला टीसी हवी आहे किंवा माझ्या