थोडा है थोडे की जरुरत है @ 24.07.18
जजमेंटल इंग्रजी भाषेतला हा शब्द मी माझ्या साहित्याच्या अभ्यासात वाचला होता . परंतू फार तिव्रतेने मी इंग्लीश विंग्लीश नावाच्या एका चित्रपटात श्रीदेवीच्या तोंडी ऐकला . बरेच वेळा आपण जजमेंटल होतो आणि त्यानुसार वागू लागतो . असे करणे चूक असते असे नाही कारण आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन आपण जजमेंटल होतो . परंतू कधी कधी या नादामधे आपण अकारण काही लोकांवर अन्याय करतो . आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन आपले काही बाबतीत फार ठाम मत बनलेले असते व त्यावरुनच आपण लोकांच्या वागण्यासंदर्भात आडाखे बांधतो , त्यांच्या कृतींबद्दल वाच्यता करतो व आपले मत व्यक्त करतो . परंतू असे करणे कधी कधी फारच चुकीचे व अन्यायकारक होऊ शकते . विशेषतः अश्या व्यक्तीच्या बाबतीत जी व्यक्ती आपल्या पूर्व अनुभवांपेक्षा संपुर्णपणे वेगळी वागून आपल्याला आश्चर्याचा धक्का देते . अश्या व्यक्तींच्या धक्क्यामुळे आपण उगाच जजमेंटल झालो असे आपल्याला वाटू लागते . आपल्याला आलेले अनुभव जरी तसे असले तरी ती व्यक्ती आपल्याला आलेल्या ...