Posts

Showing posts from November, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.11.19

Image
तटस्थ पहाटे मी नेहेमीप्रमाणे फिरायला निघालो असताना मला दो न वेगवेगळ्या व्यक्ती दिसल्या . या दोन्ही व्यक्ती परस्परांशी अजिबात संबंधित नव्हत्या . या दोन्ही व्यक्तींची मला दिसण्याची ठिकाणे वेगवेगळी होती . परंतू त्यांच्या कृती मात्र जवळपास सारख्या होत्या . तसे बघितल्यास सामाजिक दृष्टीने त्या कृतींमागील कारणे संपुर्णपणे वेगळी होती . परंतू त्यांच्या कृतीचा परीणाम सारखा असल्याने मला त्याबद्दल काही प्रमाणात साधर्म्य वाटले . मला त्या कृतीचा परीणाम जो माझ्या आणि माझ्यासोबतच्या काही लोकांना जाणवला त्याबद्दल सांगायचे आहे . शेवटी आपण कोणत्याही घटनेकडे किंवा कृतीकडे बघत असताना आपल्या मनावर असलेल्या विचारांचा प्रभाव बाजूला ठेऊ शकत नाही . वर्षानुवर्षे एका विशिष्ट विचारसरणीत मोठे होताना किंवा अनुभव घेताना आपले विचारांचे देखील एक विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व बनलेले असते . आपण त्याच अनुषंगाने सर्व बाबींकडे बघत असतो . म्हणूनच अनेक वेळा गरज असूनही आपल्याला तटस्थपणे बघणे जड जाते व आपण कोणतीतर