थोडा है थोडे की जरुरत है @15.10.19
संस्कारांची सहजता सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या फायद्यांबाबत मागे एका लेखामधे मी विस्तृत वर्णन केले होते . या सोशल मिडीयाचा एक फायदा आणखी झाला तो म्हणजे आपल्याला आपल्या गुरुजनांना पुन्हा भेटता येते . जुन्या काळात जी कदाचित फारच विरळी घटना होती . अर्थात आपल्या गुरुजनांनी स्वतःला अपडेट ठेवले असेल तर हे शक्य होते . परंतू अश्या भेटी या सुखावणाऱ्या असतात . कारण ही सारी मंडळी त्या काळातली मार्गदर्शक होती ज्या काळात आपली आजसारखी ओळख निर्माण झालेली नव्हती , त्या काळात विचार स्विकारण्याची सर्वाधिक तयारी होती व सर्वात महत्वाचे म्हणजे जगण्याची सहजता होती . त्या काळामधे आपल्याला मार्गदर्शन केलेले मार्गदर्शक जेव्हा आता भेटतात तो अतीव आनंदाचा क्षण असतो . अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात विद्यार्थी असताना आम्हाला शिकविणाऱ्या अनेक चांगल्या शिक्षकांपैकी एक म्हणजे प्रा . वासुदेव मराठे . सर नव्या काळानुसार सोशल मिडीयाच्या वापराबाबत जागरुक असल्याने आम्हा सर्वांना पुन्हा भेटले . आम्हा...