Posts

Showing posts from January, 2017

My last article published under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
माझा हात सोडू नको!! त्या एका सायंकाळी महाविद्यालयातून थकून मी घरी पोहोचलो व जरा बसत नाही तर एक फोन आला...साधारण बऱ्यापैकी वय असलेल्या एका महिलेचा आवाज मला ऐकू आला... अविनाश मोहरील बोलता का? ...हो बोलतोय....मोहरील साहेब, आपले वय कळू शकेल? असे अचानक वय विचारुन बोलणाऱ्या त्या वयस्कर महिलेच्या पवित्र्याने मी जरा दचकलो...मी ४५ वर्षांचा आहे... म्हणजे मला मुलगा नसला तरी तुम्ही जवळपास माझ्या मुलाच्याच वयाचे आहात... असो. मी आज तुमचा दै. हिंदुस्थानमधे सुटका नावाचा लेख वाचला. त्यामधे एका पक्षाचा पाय कापून तुम्ही जगाच्या लेखी क्रूर वाटणारी कृती केलीत, पण त्याशिवाय त्या बिचाऱ्याची सुटका होऊ शकत नव्हती... त्या छोट्याश्या घटनेचा संबंध तुम्ही फार छान प्रकारे मानवी जीवनाशी जोडलात...पण प्रत्येकवेळी पाय कापून सुटका करायला तुमच्यासारखे लोक भेटत नाहीत... माझा पाय मीच कापून घेतेय...असे शेवटचे काहीतरी भयंकर बोलून त्यानंतर पुढचे पंधरा मिनीटे ती बाई फोन हातात घेऊन केवळ रडत राहीली...मी फोन कानाला धरुन तिचे हुंदके ऐकत बसलो. काही सुचत नव्हते.. साधारण पंधरा मिनीटांनंतर तिचा तो दुःखावेग ओसरल्यानंतर जवळपास रडत रडत

My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
थांबुयात? थांबुयात? सहजच तिने विचारले... त्याने उत्तर दिले नाही, केवळ तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांची तीव्रता जाणवून घेतली. ती असे का म्हणतेय याची पुरेपुर जाणीव त्याला होती. तिच्या जीवाची ओढताण त्याला जाणवित होती. समुद्राच्या त्या किनारी शांतपणे एकमेकांचा हात हातात धरुन ते बहुदा त्यांच्या आयुष्यात शेवटचे सोबत चालत होते. जवळपास अस्ताला पोहोचलेला सूर्य, त्याच्या मावळत्या रुपाची लाल गर्द छटा सागराच्या लाटांना उजळून टाकीत होती, त्या विस्तिर्ण सागराच्या खळाळत्या लाटा किनाऱ्यावरील पांढऱ्या शुभ्र वाळूवर सुरेख नक्षीकाम करीत होत्या परंतू एका लाटेच्या आगमनासह तयार झालेली नक्षी दुसरी लाट मोडून टाकीत होती आणि परत नवी नक्षी निर्माण करुन निघून जात होती... लाटांचा हा नक्षी मांडण्याचा व मोडण्याचा खेळ सुरु होता. खळखळत्या लाटांच्या लयबद्ध आवाजा व्यतिरीक्त कोणताही आवाज तेथे नव्हता.. म्हणूनच सखीच्या - थांबुयात? - या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने कसलाही प्रतिसाद न देता केवळ तिचा हातात धरलेला हात अलगद सोडून दिला आणि त्याला मनापासून आवडणाऱ्या तिच्या डोळ्यातील खोलवर वसलेले भय आणि त्या भया

My article published in Hindusthan under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
रिश्तोंका इल्जाम ना दो!! गुलजार या माझ्या मनःस्वी आवडणाऱ्या कवीच्या लेखणीतून एका सुंदर गीतामधे परावर्तित झालेल्या काही ओळी मी एका परवा सायंकाळी शांतपणे ऐकत होतो. संगीत माणसाच्या मनाला सुखद अनुभूती देणारे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे मानणाऱ्या संगीत प्रेमींपैकी मी एक आहे. संगीताची मनापासून आवड आहेच व त्यासोबतच साहित्याचा विद्यार्थी व शिक्षक असल्याने गीतांमधील काव्यानुभूती घेण्याचे माझ्या गुरुजनांनी शिकविले. म्हणूनच गुलजारच्या गाण्याचा आनंद घेताना काव्य मनाला थेट भिडते. अनेकांना असा अनुभव येतो. त्या सायंकाळी गुलजारच्या अनेकवेळा ऐकलेल्या परंतू प्रत्येकवेळी नव्याने समजलेल्या एका गीताचे शब्द ऐकल्यावर मात्र मला एक नवी बाब लक्षात आली. माणसांच्या नात्यांमधील एक विलक्षण बाब. माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण जन्मतःच वेगवेगळ्या नात्यांमधे गुंतून या जगात येतो. ती नाती कायम आपल्या सोबत असतात. परंतू काही नाती ही मात्र आपले जीवन जगत असताना निर्माण होतात. यातील काही नाती केवळ आणि केवळ निखळ व पवित्र प्रेमाच्या आधारे तयार झालेली असतात ज्या नात्यांना कोणत्याही नावांच्या चौकटीत बसविता येत नाही. निव्वळ