Posts

Showing posts from November, 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 01.12.20

Image
दुरावा जपावा ... कोणता ? त्या दिवशी त्या फोनवर माझा मित्रच बोलतोय यावर माझा कितीतरी वेळ विश्वास बसला नाही . कारण माझ्याशी बोलताना तो स्वर , ती भाषा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला बोचणारा तो अनौपचारिकपणा मला सहनच झाला नाही . हे काय झालंय ? हे काय होऊन बसलंय ? कश्या प्रकारच्या व्यवस्थेचा भाग आपण सारे झालोय ? अनेक दिवसांच्या सवयीनंतर हा भाग आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक तर बनणार नाही ना ? असे कित्येक प्रश्न मनात निर्माण झाले . माझा मित्र जो एरवी अमरावतीला आला की अक्षरशः घरी येऊन धडकतो . धडकणे हा शब्द शब्दशः त्याच्या येण्याला लागू होतो . दरवाज्यातूनच मोठी आरोळी देत , आहे का बे घरी ? असे म्हणून सरळ दार लोटून घरात येणार , मला कडकडून मिठी मारणार , मग मला बुक्क्यांचा मार देणार , आणि त्यानंतर मग अक्षरशः जमिनीवर अस्ताव्यस्त पाय पसरुन बसणार आणि मग मनसोक्त गप्पा मारणार ही त्याची अनेक वर्षांची पद्धत ठरलेली होती . माझ्या मुलांना देखील त्याच्या या असल्या वागण्याचे सुरुवातीला