Posts

Showing posts from January, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.01.19

Image
वॉर क्राय सात वर्षांची ती चिमुरडी आपल्या गरोदर आईचा हात धरुन हळू हळू समोर चालू लागते . डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात . तिच्या आईची तर स्थिती अतिशय वाईट असते . परंतू धिराने ती पोर आपल्या आईचा हात धरुन एक एक पाऊल पुढे टाकत जाते . तिच्या समोर काय असतं ? देशाच्या तिरंग्यामधे लपेटलेल्या काही लाकडी पेट्या असतात ज्यामधे दहशतवादी हल्ल्यामधे शहीद झालेल्या सैनिकांचे शव ठेवलेले असतात . सर्वात मधली पेटी ज्या दिशेने ती पोर आपल्या आईला घेऊन निघाली असते ती पेटी तिच्या वडीलांच्या शवाची असते . एका काळरात्री सिमेच्या पलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी उरी या गावाला असलेल्या एका सैनिकी कॅम्प वर हल्ला चढविला असता तिच्या वडीलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते , परंतू चुकून त्याच्या शरीराला लागलेल्या हँडग्रेनेडची पीन निघाल्यामुळे तिच्या वडीलांचा देह त्या ग्रेनेडच्या स्फोटामधे छिन्न विछिन्न झाला होता व तिने आपल्या लाडक्या बाबाला गमावले होते . वडीलांच्या शवपेटीजवळ पोहोचल्यावर त्या