थोडा है थोडे की जरुरत है @ 14.04.20
समय का ये पल .. खूप अस्वस्थता निर्माण झालीय रे मनात . काही सुचत नाहीये . अशी विचित्र अवस्था यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती मी . अनेक कठीण प्रसंग देखील आले परंतू त्या प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे निभावून नेले . उलट अनेक वेळा मीच सोबतीच्या लोकांकरीता मानसिक आधार बनले . परंतू यावेळी मात्र काहीतरी विचित्र झालेय . असेही काही नाही की घरात असल्याने असे होते . मलाच आठवते की महिन्यातून बरेच वेळा दहा दहा दिवस देखील बाहेर निघणे होत नाही . घरची कामे सुरु राहतात , बाहेरची कामे कुणीतरी करुन टाकते आणि मला बाहेर जाण्याचे कामच पडत नाही . पण आता सध्या मात्र काहीतरी वेगळे होतंय रे . नेमके काय झालेय ते मला सांग म्हणजे मला त्याच्यावर इलाज करता येईल . एका मैत्रिणीचा अत्यंत निराश झालेल्या आवाजात फोन आला . नेमके काय वाटतेय ते आणखी विस्तृतपणे सांग , मी म्हणालो . त्याच टोनमधे ती पुढे सांगू लागली . असे वाटतेय जीवन एक तर थांबलेय किंवा अतिशय संथ गतीने कंटाळवाणे सुरु आहे . सारख्या त्या ब...