थोडा है थोडे की जरुरत है @05.02.19
राजमलाई बाबा , आज मला माझ्या आवडीचे चॉकलेट हवंय . माझ्या मित्राचा मुलगा हट्ट करीत होता . आज माझी परीक्षा संपली त्यामुळे आज मला चॉकलेट हवंच आहे . गेले आठ दिवस मी तुम्हाला काहीही मागीतले नाही आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अभ्यास देखील केला . आता तुम्हाला माझे ऐकावेच लागेल . मला चॉकलेट हवे . माझा मित्र मात्र लगेच तयार होत नव्हता . मी त्याला म्हणाले की एका चॉकलेट साठी त्याला परवानगी का देत नाहीस ? एवढे काय त्यात ? माझा मित्र म्हणाला , अरे त्याचे चॉकलेट म्हणजे तुला माहीत नाही . ते काही आपल्या काळातले पन्नास पैसे किंवा एक रुपयाचे आहे का ? आज तो त्याच्या आवडीचे म्हणजे नव्याने बाजारात आलेले व ज्या चॉकलेटची जाहीरात त्याने टीव्हीवर बघितलीय ते पावणे तिनशे रुपयाचे चॉकलेट मागतोय . पावणे तिनशे ? मी उडालोच . हो ! पावणे तिनशे आणि माझा पोरगा म्हणतोय की फक्त टू हन्ड्रेड अँड सेवन्टी पाईव्ह रुपयेच तर हवे आहेत ! पावणे तिनशे रुपयाचे चॉकलेट असल्याने माझा मित्र त्याला नकार देतोय ते ...