Posts

Showing posts from October, 2023

थोडा है थोडे की जरुरत है 31.10.23

Image
फोन नंबर अत्यंत जवळचे असलेले व खरा खुरा आधार देणारे माझे एक काका व अमरावती शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ . रमेश गोडबोले यांचे अत्यंत दुर्दैवी निधन झाले . काकांचा माझ्या परीवाराला जसा आधार होता तसाच अमरावती शहरातील अनेक परीवारांना होता . अनेकांना त्यांनी जिवनदान दिले आहे . अनेकांची आयुष्ये सावरली . असे आम्हा सर्वांचे आधार असलेले काका अचानक अल्पशा आजारामुळे सोडून गेले . काकांना श्रद्धांजली देण्याकरीता अमरावती शहरातील विविध संस्थांनी मिळून एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते . त्या सभेकरीता काकांच्या जीवनावर एक चित्रफित बनविण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती . काकांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेणारी ती चित्रफीत मी तयार केली . परंतू नेमके श्रद्धांजली सभेच्या दिवशी एका महत्वाच्या कामानिमित्त परगावी गेल्यामुळे मी त्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही . माझ्या अनुपस्थितीतच ती चित्रफीत तेथे दाखविण्यात आली . मी रात्री परतलो तेव्हा बऱ्याच मित्र मंडळींचे फोन आले . चित्रफित

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.10.23

Image
मन कस्तुरी रे .. जग दस्तुरी रे !! माझ्या थ्री बीएचके फ्लॅट कडे बघून आणि आतापर्यंत मी जे माझ्या प्रगतीबद्दल सांगितले ते ऐकून माझा मित्र म्हणून तुला माझ्याबद्दल निश्चितच अभिमान वाटला असेल . पण या माझ्या सोनेरी यशाला देखील एक मनाला व्यथित करणारी काळीकुट्ट किनार आहे . त्याबद्दल खरे तर मी फार बोलत नसतो परंतू तुझ्यापासून लपवू देखील शकत नाही . त्यानंतर त्याने डोळ्यातून पाणी ओघळणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करून त्याने त्याच्या आयुष्याची ती किनार माझ्यासमोर उघड केली . तो जेव्हा ते सारे बोलत होता तेव्हा माझ्या मनात त्याच ओळी उमटत होत्या .. मन कस्तुरे रे .. जग दस्तुरी रे .. माझा मुलगा एका बोर्डींग स्कुलमधे आहे . तो घरी येत नाही . म्हणजे मी त्याला येथे आणत नाही . कारण तुला सुंदर वाटणाऱ्या या घराच्या त्याच्या मनात फार चांगल्या स्मृती नाहीत . कंपनीमधे कामाला सुरुवात झाल्यावर मी प्रचंड मेहनत करायला लागलो . मी तुला सांगितल्याप्रमाणे मला तो बालपणी मनावर उमटलेला गरीबीचा डाग