Posts

Showing posts with the label काळजाचा ठोका

थोडा है थोडे की जरुरत है @ 17.08.21

Image
काळजाचा ठोका कधी कधी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या मनावर असा काही परीणाम होतो की त्या गोष्टींच्या प्रभावामुळे आपल्या विचारांची दिशा बदलते . ज्या प्रमाणे या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडतात व आपल्याला कळतात त्या प्रमाणे आपल्याही मनोभूमिका बदलत राहतात . परंतू कधी कधी मनात असलेले विचार व प्रत्यक्ष घडणारी घटना या दोन बाबी जर एकत्र झाल्या तर मात्र काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही . आपल्यापैकी प्रत्येकाने असा काळजाचा ठोका चुकण्याचा अनुभव घेतला असणार . अशी घटना वर्णन करणे सोपे असते परंतू त्याक्षणी मात्र त्याचे काय झाले असते हे त्याचे त्यालाच ठाऊक असते . असाच काळजाचा ठोका चुकविणारा प्रसंग मी अनुभवला . त्या चार मिनिटात मी आतापर्यंत कधीच चालविली नाही एवढ्या वेगात गाडी चालविली . तो प्रसंग आटोपल्यावर जेव्हा तटस्थपणे विचार केला तेव्हा खरे तर मला एवढे अस्वस्थ होण्याची गरज नव्हती पण का कोण जाणे त्यावेळी मी ज्या भुमिकेत होतो त्या भुमिकेमुळे माझ्या काळजाचा ठोका ...