Posts

Showing posts from September, 2017

थोडा है थोडे की जरुरत है@२६.०९.१७

Image
तिला उडू देताना … सोनुली , बाबा बोलतोय … आज तुला एका नव्या विश्वात सोडून मी जेव्हा परत फिरलो तेव्हा नकळत डोळ्यात दोन अश्रू गोळा झाले . गाडी वळे पर्यंत आरश्यात तुला बघत राहीलो आणि तूझा टाटा करणारा हात मला दिसत राहीला … पण मग गाडी वळली … मला ती वळवावीच लागली आणि कारण मला तुला सोडून ६२० किलोमीटर अंतरावरील आपल्या मूळ ठिकाणी जायचे होते . गाडी आपल्या गतीने चालत आपल्या घरापर्यंतचे अंतर कमी करत होती आणि तुझ्या माझ्यातले भौतिक अंतर वाढू लागले होते . गाडीत तुझी आई , तुझा भाऊ आणि मी बसलो होतो . गाडी सुरु होती पण नेहमीसारखे आम्ही कुणीही बोलत नव्हतो . कारण प्रत्येकाला तूच दिसत होतीस .. आम्हाला टाटा करणारी आमची मोठी झालेली छकुली . १७ वर्षांपूर्वी भोपाळला दवाखान्यामधे जेव्हा त्या नर्सने मला सर्वात पहिल्यांदा तुला माझ्या हातात दिले तेव्हा तुझ्या मृदू शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनावर उठलेला रोमांच अद्याप मी विसरु शकलो नाही . माझा अंश असलेली तू माझ्या हातात एका स्वतंत्र