Posts

Showing posts from March, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 23.03.21

Image
तू मुलगी आहेस म्हणून नाही तर ... एकविसाव्या शतकातल्या एकविसाव्या वर्षी तुझ्या एकविसाव्या वाढदिवसानिमीत्त तुला शुभेच्छा देताना विसाव्या शतकात मोठा झालेला तुझा बाप म्हणून मला तुझ्याजवळ माझे मन मोकळे करता येतेय हीच मला एक मोठी उपलब्धी वाटतेय . विसाव्या शतकात मोठा झालेला माझ्यासारखा प्रत्येक बाप आपल्या मुलीशी हे सारे बोलू शकतोय याबद्दल खरे तर तुझे व तुझ्या पिढीच्या प्रत्येक मुलीचेच कौतुक आहे . बापाला बाप न समजता मित्र मानण्याची हिंमत तुम्ही केली . प्रसंगी त्या पद्धतीच्या मैत्रीसाठी भांडलीस , वाद केला , चिडलीस परंतू हळू हळू आपल्यात मैत्री होऊ शकली . तुझ्या या बाबतीतल्या हटखोरपणामुळे का होईना परंतू मला माझ्या बापाच्या भूमिकेमधून बाहेर निघून तुझ्यासोबत मैत्रीच्या भूमिकेत शिरता आले . परंतू हे तुझ्यासाठी सोपे होते कारण तू एकविसाव्या शतकातल्या नव्या मानसिकतेला बघत आणि अनुभवत मोठी झाली आहेस . माझ्यासाठी मात्र ते खरोखरीच कठीण होते आणि मला ते पूर्णपणे जमले देखील नाहीये . अजून