Posts

Showing posts with the label मनाची उभारी

थोडा है थोडे की जरुरत है @ 04.01.22

Image
मनाची उभारी .. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या रविवारी एका चहाच्या दुकानात त्या तरुणांच्या समुहाचा गोंधळ अनुभवल्यानंतर मन खिन्न झाले . ज्या क्षेत्राचे या सर्व बाबींकरीता सर्वात जास्त योगदान आहे त्या शिक्षण क्षेत्रात मनापासून काम करीत असूनही असे चित्र बघायला मिळावे ही वेदनादायी बाब होती . माझा मागचा लेख वाचल्यावर अनेकांनी प्रतिक्रीया देताना त्यांनाही अश्याच प्रकारचे अनुभव आल्याचे मला कळविले . याचा अर्थ अश्या बाबी वरचेवर घडत आहेत . याबाबत आणखी जास्त काम करणे गरजेचे आहे व महाविद्यालयीन व्यवस्थांमधेच या तरुणांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे असा विचार मनात डोकावला . परंतू त्या अनुभवाने खिन्न होऊन आम्ही अमरावतीच्या छत्रीतलावाकडे निघालो . तेथे पोहोचल्यावर मात्र मला तरुणाईचे एक नवे व मनाला उभारी देणारे रुप दिसले . त्या चहाच्या दुकानातल्या एका प्रसंगाने मी खिन्न झालो होतो परंतू येथे मला तरुणांचे दोन समुह दिसले जे असे काही करत होते ज्यामुळे खरोखरीच मना...