Posts

Showing posts from 2022

थोडा है थोडे की जरुरत है @ 17.05.22 Last Article

Image
तेरा तुझको सौंपता … नेहेमीप्रमाणे दै . हिंदुस्थानमधे तो लेख प्रकाशित झाला . अनेकांपर्यंत तो पोहोचला . सोबतच सोशल मीडीयावर माझ्या त्याच लेखाच्या ब्लॉगची लिंक देखील शेअर केल्यामुळे सध्याच्या वेगवान युगात तो अनेकांपर्यंत पोहोचला . नेहेमीप्रमाणे माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक वाचकांनी प्रतिसाद दिला . परंतू तो दिवस मला एक अत्यंत विलक्षण अनुभव देणारा ठरणार आहे हे मला माहित नव्हते . गेली जवळपास सात वर्षे मी हे सदर लिहितोय व दै . हिंदुस्थानचा प्रबंध संपादक , माझा सन्मित्र विलास मराठे यांस एकही शब्द न बदलविता प्रकाशित करतोय , या प्रवासात अनेक वेळा मला वाचकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया प्राप्त झाल्या . कुणी सूचना केल्या , कुणी आमच्याच आयुष्यातील तुम्ही काहीतरी बोललात असे म्हणले , तर कधी तुम्ही जे लिहीलंत ते आदर्श म्हणून ठीक आहे परंतू व्यावहारिक नाही म्हणून बोलून दाखविले . काही वाचकांना मी जे लिहीले ते पटले नाही परंतू या लिखाणातून जो प्रेमबंध निर्माण झाला त्यामुळे त्यांनी मला ते