Posts

Showing posts with the label विराट मन

थोडा है थोडे की जरुरत है @ 18.06.19

Image
विराट मन सध्या क्रिकेटच्या विश्वचषकाचे वारे जोरात सुरु आहेत . भारतीय चमुचा विजयरथ जोरात धावतोय . अतिशय बलाढ्य मनल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रीका , ऑस्ट्रेलीया आणि पाकीस्तान या चमुंना पराभूत करुन भारतीय चमू विश्वचषकाची प्रबळ दावेदार बनलेली आहे . जगातील अनेक लोक या विश्वचषकाला फॉलो करीत आहेत व यामधील वेगवेगळ्या मॅचेस सोबत मैदानावर घडणाऱ्या काही विशेष बाबी देखील चर्चेत आहेत . सोशल मिडीयामुळे त्या भराभर सर्वत्र व्हायरल होत आहेत . एक घटना अशीच सर्वत्र पसरली आणि त्याबाबत मोठी चर्चा झाली . त्या घटनेबद्दल वाचल्यानंतर मनाला खरोखरीच आनंद झाला परंतू त्याचे ज्या प्रमाणात कौतुक झाले त्यावरुन ती बाब किती विरळ झालीय आणि सध्याच्या जगात ती बघायला मिळत नाही याची मात्र जाणीव झाली . या वर्षीच्या विश्वचषकाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे हा इंग्लंडमधे खेळला जातोय जेथे या खेळाची सुरुवात झाली . इंग्रजांनी हा खेळ सुरु केला व जगभर जेथे जेथे इंग्रजांचे राज्य होते तेथे तेथे त्यांनी हा खेळ आपल्या...