Posts

Showing posts from December, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.12.19

Image
निघालास ? निघालास ? वेळ झाली देखील जाण्याची ? किती रमलो आम्ही तुझ्यासवे . कधी आला होतास रे तू ? काही आठवत देखील नाही . पण आभाळभर आनंद घेऊन आला होतास सोबत . तुझ्या येण्याने बागेतल्या फुलांनाही आनंद झाला होता कारण त्यांनाही दिसले होते आमचे उजळलेले चेहेरे . अजूनही आठवतोय तो तुझ्या येण्याचा दिवस . तू नसताना लागलेल्या काही सवयी मोडताना सुरुवातीला झालेला त्रास देखील आठवतो . सारे नव्यागतच होते ना रे ! तुझ्या येण्याने किती आनंदलो आम्ही सगळेच . काय काय ठरविले तूझ्या आगमनासोबत ! अमूक करायचे , तमूक करायचे . नाही म्हणायला तू नसतानाची स्थिती मधून मधून डोकावतच होती सुरुवातीला . परंतू मग तू स्थिरावलास अगदी अलगद . एखाद्या सुरेल पहाटेवर धुक्याची चादर पडावी ना , अगदी तस्साच अलगद . आणि मग सुरु झाला तुझा सहवास . काय मस्त होता तो . त्याचा आनंद घेत घेत पुढे जातच होतो की अचानक तुझ्या जाण्याची वेळ येऊन ठेपली . काय हे ? तुझ्यामुळे जे काही मिळाले त्याचा आनंद भरभरुन घेण्याला व ती थेट ह्रदयाला