Posts

Showing posts from January, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.01.18

Image
प्रेमाचा परतावा साधारण चार वर्षांपूर्वी या साऱ्यांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता . या साऱ्याची मनापासून काळजी घेणारी , त्यांचे संगोपन करणारी , त्यांना हवे नको बघणारी , त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती अचानक निघून गेली … आणि ही सारी पोरकी झाली … एका क्षणात . या सर्वांचे खरे तर भाग्य होते की एक अशी व्यक्ती त्यांना त्यांच्या जीवनाचा आधार म्हणून लाभली होती . अन्यथा या बदलत्या वेगवान जगात अनेकांना नाईलाज असतो म्हणून आपल्या वर्तुळापलीकडे बघताही येत नाही . त्या वर्तुळातच रहायचे व तेथेच काय तो आनंद मिळवायचा अशीच स्थिती अनेकांची झालीय . अश्यावेळी या साऱ्यांकडे बारकाईने लक्ष देणारी व त्यांचे खऱ्या अर्थाने पालनपोषण करणारी व्यक्ती त्यांना मिळणे हे त्या सर्वांचे भाग्यच होते . कधी कधी मला तर आश्चर्य वाटायचे की त्या व्यक्तीला या साऱ्यांच्या सहवासात आणि त्यांना इतका वेळ देण्यात काय मिळत असेल . त्या व्यक्तीला मी कधी ते विचारले नाही परंतू हा म