थोडा है थोडे की जरूरत है @19.12.17
बोलुयात … मोकळेपणाने आपण भारतीयांनी सेक्स संबंधी आता मोकळेपणाने बोलण्याची नितांत गरज आहे . माझ्या आजच्या लेखाचे हे पहिले वाक्य वाचल्याबरोबर आज बऱ्याच वाचकांच्या मनात काय काय प्रतिक्रीया उमतील याचा मी विचार केला . सर्वात पहिली प्रतिक्रीया ही की सरांनी आज हा भलताच विषय निवडलाय . असे तर कधी झाले नाही . हे काय नविनच ? किंवा आजचा लेख पोरांना वाचायला वगैरे देण्यात अर्थ नाही . आजचे वर्तमानपत्र लपवून ठेवायला हवे कुणाच्या आणि विशेषतः पोरांच्या हाती पडायला नको . अगदी टोकाची म्हणजे हा विषय काही लेखाचा विषय राहू शकतो का ? काहीही लिहायचे ? शोभत नाही वगैरे . आपल्या देशाच्या सांस्कृतिक व सामाजिक संरचनेमधे या प्रतिक्रीया मनामधे येणे अजिबात गैर नाही . माझ्या सदरामधून सकारात्मक सामाजिक संवादाच्या दृष्टीने माझ्या मनातील विचार प्रसृत करण्याची जी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयास करीत असतो त्याच जबाबदारीचे निर्वहन करताना मला हे वाक्य व त्या विषयाबाबत लिहीताना करायचे आहे . हा विषय मांडण्...