Posts

Showing posts with the label सोप्पे…नि…सरळ!!

थोडा है थोडे की जरुरत है @ 03.01.23

Image
सोप्पे .. नि सरळ !! कधी कधी आपल्याला साध्या गोष्टी देखील क्लिष्ट करून ठेवण्याची सवय लागते . तसे बघता गोष्टी सोप्या असतात परंतू त्यांना तेवढ्याच सोप्या पद्धतीने समजून घेणे अनेकांना जमत नाही . साध्या सरळ गोष्टींचा गुंता करायचा व नंतर तो गुंता सोडवत राहणे हे देखील अनेकांना आवडते . परंतू याचा परीणाम आपल्या मनावर ताण निर्माण करण्यामधे होतो हे आपण लक्षात घेत नाही . सोप्पे नि सरळ जगता येणे ही देखील एक कलाच आहे . जीवनाकडे बघण्याचा सोप्पा नि सरळ दृष्टीकोन असलेला एक व्यक्ती मला नुकताच भेटला . एका कामानिमित्त नुकतेच भोपाळला जाण्याचा योग आला . तेथे मला अमेरीकेत राहणारा एक माणूस भेटला . मी त्याला ओळखत होतो परंतू भेट पहिल्यांदाच होत होती . तो , मी व इतर काही जण गप्पा मारत बसलो होतो . इतर गोष्टींसोबत पुन्हा वाढू शकणाऱ्या कोरोनाबद्दल स्वाभाविकपणे गोष्टी सुरु झाल्या . आमच्यापैकी एका मित्राने त्याला विचारले की तू कधी परत जाणार आहेस ? त्यावर तो उत्तरला की तो १५ जानेवारीनंतर ...