Posts

Showing posts with the label स्वामी समर्थ पान सेंटर

थोडा है थोडे की जरुरत है @20.03.18

Image
स्वामी समर्थ पान सेंटर आजच्या लेखाचे शिर्षक देखील काही जणांना जरा चकित करेल . स्वाभाविकच आहे . हे वाचून त्याबद्दल माझ्या एका मित्राने खूप राग व्यक्त केला . या नावाच्या एका पानठेल्याच्या पाटीने त्याचा तिळपापड झाला होता . त्याच्या श्रद्धेला कुठेतरी ठेच लागल्यासारखे त्याला वाटत होते . लेखाचे केवळ शिर्षक वाचल्यावर काही जणांना तसेच वाटण्याची शक्यता आहे याची मला जाणिव आहे . तरी देखील … झाले असे की , आपल्या श्रद्धा स्थानाचा वापर बरेच वेळा फार चुकीच्या पद्धतीने केला जातो या विषयावर चर्चा रंगली होती व त्या चर्चेमधे सहभागी होताना माझा मित्र म्हणाला , आपल्या गावातील शिलांगण रोडला एक स्वामी समर्थ पान सेंटर नावाचा पान ठेला आहे . ज्या दुकानात तंबाखू , सिगरेट , घुटका अश्या हानीकारक गोष्टी विकल्या जातात त्या दुकानाला स्वामी समर्थांचे नाव सहनच होऊ शकत नाही . मी रोज गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो , मनोभावे प्रार्थना करतो , जिवन चांगल्या प्रकारे व्यतीत करण्याची मला तेथे प्...