थोडा है थोडे की जरूरत है @ 17.10.17
धनत्रयोदशी काही वर्षांपूर्वी धनत्रयोदशी कशी साजरी करायची याबाबत एका घरात चर्चा सुरु होती . त्या वर्षी विशेष चर्चेचे कारण होते की आईच्या एका फिक्स डीपॉझीटची मॅच्युरीटी झाली होती . एकदम दहा लाख रुपये मिळणार होते . सर्वांनी आपापल्या मागण्या करणे सुरु केले . पोरगा म्हणाला , मला एक नविन गेयरची सायकल हवी आहे . मुलीने तर नवी स्कुटर घ्यायचे ठरविले आणि त्याचा रंग देखील ठरवून टाकला . बाबा म्हणाले की आपण बढीया कार घेऊ . खूप दिवसांची इच्छा आहे . मागण्या वाढत चालल्या होत्या . कुणाला एअर कंडीशनर हवा होता तर कुणाला घराचे रंगरुप पालटायचे होते . कुणाला फर्निचर हवे होते तर कुणाला मोठा एलईडी टीव्ही हवा होता तर कुणीतरी आईसाठी नव्या साड्या घेण्याचे सुचविले होते . सर्वांच्या चर्चा सुरु असताना त्या आनंदात जिचे ते फीक्स डीपॉझीट होते तिला मात्र कुणीच विचारत नव्हते . या सर्वांना त्या चर्चेच्या वातावरणात सोडून ती हळूच तेथून उठून आपल्या खोलीत गेली . तिच्या आवडत्या खिडकीजवळील जागेजवळ बसून ...