थोडा है थोडे की जरुरत है@19.03.19
रीवाईंड विद्यापीठातर्फे प्राचार्यांकरीता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे असा इ - मेल मला प्राप्त झाला . नव्या पद्धतीनुसार त्या इ - मेलमधे त्यांनी गुगल फॉर्म दिला होता . आजकाल तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे अर्ज प्राप्त करा , मग ते भरा , मग तो सादर करा आणि या साठी विद्यापीठात किमान दोन वेळा कार्यालयीन वेळात जा हे सारे बंद झाले . गुगल फॉर्ममुळे लगेचच प्रत्येकाच्या सोयीनुसार अर्ज ऑनलाईन सादर करता येतो आणि आयोजकांना देखील सर्व माहिती अचूक प्राप्त होते . या अर्जामधे जन्मतारीख भरण्याकरीता क्लिक केले की एक कॅलेंडर येते . त्यावर आपल्या जन्माचे वर्ष , महिना आणि तारीख निवडले की ती तारीख आपोआप येते . एरवी त्या वर्षांवर क्लिक केले की त्यातील वर्षे सपाट्याने बदलतात . परंतू मला प्राप्त झालेल्या फॉर्ममधे काहीतरी तांत्रिक अडचण असल्याने ती वर्षे भरभर न बदलता प्रत्येक महिन्याप्रमाणे बदलत होती . त्यामुळे माझी जन्मतारीख शोधण्याकरीता मला सत्तेचाळीस वर्षे म्हणजेच पर्यायाने ५६४ महिन...