Posts

Showing posts from December, 2015

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
ब्रेक हवाच! ब्रेक - हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत सहजपणे वापरला जातो. गाडीमधे असलेल्या ब्रेकला तर मराठीत पर्यायी शब्द शोधणे कठीण जाईल. पण हा शब्द आणखी एका छानश्या संदर्भात वापरला जातो. आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीक्षेत्रात कामे करीत असताना त्यात पार गुरफटून गेलेला असतो. कधी कधी ही कामे इतकी अंगवळणी पडतात की त्यामधील आकर्षण देखील संपून गेलेले असते. अनेक लोक तर यांत्रीकपणे काम करीत असताना दिसतात. तेच तेच काम करुन कदाचित अशी यांत्रीकता येत असावी. काही लोक काचेच्या पेटीत बसून पैश्यांची देवाण घेवाण करतात तर काही महिनाअखेरपर्यंत आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी धडपडत राहतात. काही लोक वस्तू विकण्यासाठी गावोगाव प्रवास करतात तर काही मंडळी आपापल्या वर्गांमधे विद्यार्थ्यांना शिकवित राहतात. काही लोक कोर्टामधे लोकांच्या वतीने भांडत राहतात तर काही दिवसभर आजारी लोकांना तपासून त्यांचे आजार बरे करीत असतात. काही लोक लोकलच्या डब्यांमधे लटकत प्रवास करतात तर काही मोटरसायकलवरुन हजारो किलोमिटर फिरतात. काही कारमधून आपल्या कार्यलयात जातात तर काही लोक पायदळ आपल्या शेतांमधे जातात. काम करणारी प्रत्येक व्यक्ती ज

Article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मला एकटे रहायचेय काकुळतीला येऊन ती म्हणाली, मला कृपया एकटे रहायचेय. यावेळी मला कुणीही माझ्या जवळ नकोय. मला कुणीही समजावू नका, कुणी आधारही देऊ नका. माझ्याबद्दल सहानुभूती तर दाखवूच नका. मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. तेच तेच बोलून बोलून, तेच तेच करुन करुन मला आता खरोखरीच वीट आलाय. तुमची अती काळजी करणे देखील मला आता नकोसे झालेय. गंभीर चेहेरे करुन तुम्ही मला समजविण्याचा प्रयत्न करताय, माझ्या काळजीपोटीच हे सारे तुम्ही सर्वजण करताय हे मला कळतंय. पण तरीही आत्ता या क्षणी मला कुणीही जवळ नकोय. अगदी प्रेमाचं देखील कुणी नकोय. मला माझ्या स्वतःसोबत राहायचे आहे. मला विचारशून्य व्हायचे आहे. प्लीज, लीव्ह मी अलोन. सर्वांना हात जोडून ती विनवणी करीत होती. तिच्या जवळच्या लोकांना कळेचना की ही असे काय म्हणते आहे. तिच्या अश्या विनवण्यांमुळे स्वाभाविकच तीव्र प्रतिक्रीया उमटायला लागल्या. हिचे हे वागणे तर फारच विचित्र आहे. एव्हडा मोठा आघात हिच्या आयुष्यात झाला. आयुष्य अक्षरशः उध्वस्त झाल्यागत स्थिती झालीय. आम्ही सर्व जवळचे हिला आधार देण्यासाठी आलोय. हिच्या भविष्याचा विचार आम्ही सर्व करतोय आणि हिचा हा काय

Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मुखवट्यांची प्रामाणिकता कला शाखेच्या अंत्य वर्गातील विद्यार्थिनींना मी मागच्या आठवड्यात एक कविता शिकवित होतो. त्या इंग्रजी कवितेमधे माणसाला जगताना धारण करावी लागणारी वेगवेगळी रुपे वर्णन केलेली आहेत. कवी त्यात असे म्हणतो की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगानुरुप आपण वस्त्र परीधान करतो त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे मुखवटे देखील धारण केलेले असतात. या सर्व मुखवट्यांच्या गर्दीमधे आपला मूळ मुखवटा कसा आहे हे कळतच नाही. त्या मूळ मुखवट्याचा शोध हाच खरेतर आत्मज्ञानाच्या दिशेचा प्रवास आहे. अश्या पद्धतीचे ते सारे वर्णन होते. कवितेचा अर्थ कवीला साधारणपणे जसा अपेक्षित होता तसा मी सांगितला परंतू माझ्या गुरुंनी मला दिलेल्या अध्यापनाच्या मूलतत्वानुसार मी माझ्या विचारी विद्यार्थीनींना या कवितेच्या मर्माबद्दल बोलण्यास सांगितले. त्या बोलायला लागल्या. सर्वांचे छान छान विचार मी ऐकीत होतो तेव्हड्यात माझ्या एका विद्यार्थी मैत्रीणीने मलाही विचार करायला लावणारे मत मांडले. ती मला म्हणाली की सर, या कवितेतील मांडणी तथ्यांवरच आधारीत आहे. आपल्याला वेगवेगळे मुखवटे लावूनच वावरावे लागते कारण आपण सामाजिक व्यवस्थांमधे वावरतो

Article published under थोडा है थोडे की जरूरत है

Image
परीक्षा..आपल्यालाच जाणून घेण्याची देशातील उच्च शिक्षण प्रक्रीयेमधे येणाऱ्या काळात काही महत्वपूर्ण बदल संभवतात. या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच महाविद्यालयासाठी सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे - महाविद्यालयाचा दर्जा. प्रत्येक महाविद्यालय आपल्या दृष्टीने आपले वेगळेपण राखून असते. प्रत्येक महाविद्यालयाची कार्यशाली आणि वातावरण देखील वेगवेगळे असते. महाराष्ट्रामधे फार मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्थांद्वारा चालविली जाणारी महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालये फारज मोजकी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठ्या व जुन्या काळापासून कार्यरत असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांद्वारे चालविली जाणारी वेगवेगळी महाविद्यालये राष्ट्रीय पातळीच्या मानकानुसार तपासून त्याचे मुल्यांकन केल्या जाण्याची प्रक्रीया जवळपास वीस वर्षांपासून सुरु झाली. सुरुवातीला या अश्याप्रकारच्या मानकांची गरज कुणालाही न भासल्याने फार कमी महाविद्यालयांनी या प्रक्रीयेमधे सहभाग दिला. परंतू शिक्षणातील स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचल्याने आता भारतीय उच्च शिक्षण पद्धतीमधे बदल करण्याची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली. या प्रक्रीय

My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
माझी डीग्री...वीस रुपये किलो! त्याची माझी पहिल्यांदा भेट केव्हा झाली ते आठवत नाही पण एक चांगला भाजीवाला म्हणून मी त्याच्या दुकानात कधीपासून जायला लागलो हे मात्र नक्की आठवतंय. साधारण दहा वर्षांपूर्वी माझ्या घराजवळ असलेल्या भाजीवाल्याचे दुकान बंद असल्याने सहजच मी त्याच्या दुकानावर पोहोचलो. भाजी देताना त्याचे माझ्याकडे लक्ष देणे मला फार भावले. मी योग्य भाजी निवडली आहे की नाही याची तो काळजी घेत होता. भाजीपाल्यातील मला फार काही कळत नाही हे एक मिनीटात समजल्यावर खरे तर माझ्यासारखे ग्राहक काही दुकानदारांसाठी फायद्याचे असतात. जमेल तसा इतर लोकांनी काढून टाकलेला माल माझ्यासारख्यांच्या माथी मारणे अतिशय सोपे असते. परंतू हा मात्र वेगळा होता. मी निवडलेल्या भेंड्यांमधून अर्ध्या त्याने बाजूला काढल्या व चांगल्या निवडून मला दिल्या. मला त्याचा हा वेगळेपणा चटकन लक्षात आला. इतकेच नव्हे तर तो अतिशय चांगल्या भाषेत संवाद करीत होता. बोलता बोलता मधेच इंग्रजी शब्दांची पेरणी देखील तो करीत होता. त्याचा भाजी देण्याबद्दलचा प्रामाणिकपणा व त्याची भाषा या दोन्ही बाबींचा विचार करुन मला त्याच्याबद्दल सहाजिकच कुतुहल निर्