Posts

Showing posts from August, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @27.08.19

Image
आहे आभासी तरी .. सध्या सोशल मिडीयाच्या अती वापराबद्दल अनेक लोक सोशल मिडीयावरच बोलताना दिसतात . या सोशल मिडीयाच्या जाळ्यात आपण अडकलोय किंवा यामुळे युवा पिढीचे फार नुकसान होतेय अश्या संदर्भांचे लेख सोशल मिडीयावरच प्रकाशित केले जातात . हे सारे आभासी आहे व यामधे ज्या पद्धतीने आपण जोडलेले असतो त्याला काही अर्थ नाही वगैरे सांगितले जाते . हे सारेच अतिरंजीत किंवा वावगे आहे असे नाही . परंतू असे बोलणारे मंडळी एरवी प्रत्यक्ष एकमेकांना किती भेटत असतील हा संशोधनाचा विषय आहे . मुळातच वेगवान आणि क्लिष्ट बनलेल्या आपल्या आयुष्यात एकमेकांशी अश्या पद्धतीने का होईना जोडले राहण्याचे सुख आहे . एकमेकांच्या छोट्या छोट्या बाबी कळू लागल्या . अगदी वहिनींनी नव्या प्रकारची भाजी केली असेल तरी ती आपल्याला कळू शकते किंवा मित्राचा लहान मुलगा उन्हाळ्याची सुटी संपवून पहिल्या दिवशी शाळेत गेला असेल तर त्याचा नव्या गणवेषातील फोटो दिसतो व त्यावरुन त्याचा मुलगा कोणत्या वर्गात आहे हे कळू शकते . अन