Posts

Showing posts with the label मानसिक आधाराचे हात

थोडा है थोडे की जरुरत है @ 03.04.18

Image
मानसिक आधाराचे हात .. मामाचा फोन , अरे अवि तुझ्या आजीला आयसीयु मधे भरती करतो आहे , प्रकृती ठीक नाही येतोस ? दहाव्या मिनीटाला मी माझ्या मामासोबत एका रुग्णालयाच्या आयसीयुच्या बाहेर उभा होतो . आजीला भरती करण्यात आले होते . काय झाले ते सारे मामाने तेथेच उभे राहून मला सांगितले . ८२ वर्षांची माझी आजी चांगली चालती फिरती असताना अचानक एका जागी थांबून गेली . काय झाले बघण्यासाठी मामीने विचारले तर मामीच्या अंगावरच ती कोसळली . जवळच्या एका रुग्णालयात तातडीने भरती केल्यावर त्यांच्या मते मेंदूत क्लॉट आल्याने असे झाले असावे असे निदान करण्यात आले . केवळ काही तासात प्रकृती जास्त ढासळल्याने आजीला आसीयु असलेल्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले . मेंदुचे स्कॅनींग केल्यावर लक्षात आले की केवळ क्लॉट नाही तर आजीचे ब्रेन हॅमरेज झालेय . मेंदुला रक्त पुरवठा करणारी एक नसच फाटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता . उपचार सुरु झाले . मेंदुशी संबंधित आजार असल्याने गावातील एका न्युरोस...