Posts

Showing posts from June, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
समारंभ..पद्धत महत्वाची की आनंद?   आपल्यापैकी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या समारंभामधे सहभागी होत असतो. समारंभांमधे सहभागी होणे आपल्यापैकी प्रत्येकालाच मनापासून आवडत असते. कारण समारंभांमधून अनेकांच्या भेटी होतात, गप्पा होतात ज्या एरवी कामाच्या रगाड्यात राहून गेलेल्या असतात. म्हणूनच समारंभ हे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. अर्थात हीच पद्धत जगभरात आहे. किंबहुना समारंभ साजरे करण्यामागील खरी भूमिका देखील तीच असते. परंतू कधी कधी या समारंभ साजरे करण्याच्या पद्धतींमुळे समारंभ किती तणावग्रस्त होऊ शकतात याचा अनुभव नुकताच मी एका लग्न समारंभात घेतला. समारंभातील पद्धतींवरुन दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला जाऊन तो समारंभच रद्द होतो की काय असे वाटू लागले. सुदैवाने तसे झाले नाही परंतू सर्वांची एकमेकांबद्दल मने मात्र कलुषित झाली आणि ज्या दोन जीवांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती ती दोघे कावरी बावरी होऊन विषण्ण मनाने तो सारा प्रकार बघत राहीली. ते सारे बघून मला एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न पडला. समारंभामधे पद्धत महत्वाची की आनंद? सामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर आनंद हेच असायला

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
तिचे गणित कसे सुटावे? महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्य करीत असताना विविध प्रकारच्या विद्यार्थिनींची भेट होते. बरेच वेळा त्यांच्याशी संवाद साधताना वेगवेगळ्या समस्या समोर येतात. शिक्षण क्षेत्रामधे अनेक वर्षांपासून वेगवेगळे बदल होत असताना देखील अजूनही खूप बदल करावे लागणार असे प्रत्येक समस्येगणिक वाटून जाते. परंतू हे बदल फार हळूवारपणे व बरेचवेळा व्यावहारिक विचारकक्षेच्या बाहेरील ठरतात त्यामुळे त्याचे अपेक्षित परीणाम जाणवायला बराच काळ लागतो. तोपर्यंत नव्या बदलांची वेळ झालेली असते. परंतू या सर्व प्रकारांमधे अनेकवेळा विद्यार्थ्यांचे फार नुकसान होते. त्यांच्या विकासाला पोषक असे वातावरण निर्माणच होत नाही किंबहुना फार मोठ्या प्रमाणात कुचंबणा सहन करावी लागते. कधीकधी या बदलांबाबत पोटतिडीकीने बोलले देखील जाते परंतू व्यवस्था या बदलांचा स्विकार लवकर करीत नाही व त्यामुळे लहान लहान समस्या एखाद्या विद्यार्थ्यासाठी जीवनाचा जटील प्रश्न बनून जातात. एक अशीच छोटी परंतू एक छोटेसे जीवन जवळपास उध्वस्त करणारी समस्या घेऊन एक आई तिच्या लेकीला घेऊन माझ्याकडे आली. महाविद्यालयात प्रवेशांचे दिवस असल्याने पालकांच

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
कल्पक आनंदाची शीग परमेश्वराने मानवाला एक अत्यंत कल्पक व क्रियाशील मेंदू प्रदान करुन या धरतीतलावर पाठविलेले आहे. त्यामुळे केवळ पंचेंद्रीयाच्या माध्यमांतून मिळणाऱ्या आनंदांच्या पलीकडे जाऊन आत्मीक समाधानाचा मार्ग त्याला शोधता येतो. ही मानवीय कल्पकता प्रत्येक मानवामधे उपजतच असते परंतू त्याचा वापर करणे किंवा न करणे ही बाब मात्र प्रत्येक व्यक्तीनिहाय बदलत जाते. कल्पकतेने जीवनाच्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणांना आनंदक्षणांमधे परावर्तीत करायचे की वेगवेगळ्या समस्यांना कवटाळून बेचैन रहायचे हा देखील व्यक्तीपरत्वे बदलत जातो. ज्यांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त असतो त्यांना जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. त्यांना आनंद निर्माण करणारे क्षणच निर्माण करता येत असतात. पैसा हे आनंद प्राप्त करण्याचे साधन आहे अशी मान्यता असलेल्या मंडळींना जो आनंद प्राप्त होतो तो तदर्थ असतो कारण त्या आनंदाचे मोल त्यांनी खर्च केलेल्या पैश्याच्या प्रमाणात बघण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे जास्त पैसा व जास्त आनंद या सूत्रानुसार त्यांची पैसा खर्च करण्याची व तो कमावण्याची

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सुटका सकाळचा व्यायाम आणि फिरणे आटोपून मी निवांत वर्तमानपत्र वाचत बसलो असताना अंगणातून आईने आवाज दिला - अवि, हे बघ काय झालंय!! मी लगेच बाहेर जाऊन बघितले तर मला एक अत्यंत ह्रदयद्रावक दृष्य बघायला मिळाले. आमच्या घराच्या बाहेर इलेक्ट्रीकचे मीटर आहे व त्याला झाकण्यासाठी एक अॅल्युमिनीयमचा बॉक्स बनविला आहे. त्या बॉक्समधे काही दिवसांपासून एक छोट्या पक्षिणीने घरटे बनविले होते. त्यात दोन छोटी पिल्ले देखील होती. नुकते त्यांचे डोळे उघडले होते. त्या डब्याला असलेल्या गॅपमधून ती पक्षीण येणे जाणे करुन आपल्या पिलांना जेवण भरवायची. त्या दिवशी त्या डब्याच्या झाकणामधून बाहेर पडताना त्याच्या दरवाज्याच्या भेगेमधे त्या पक्षीणीचा पाय अडकला. पाय अडकल्यावर तेथून निघण्याच्या नादात तिने जी धावपळ केली त्यामुळे तिचा पाय वाईट पद्धतीने जखमी झाला व त्या अर्धवट तुटलेल्या पायाच्या जोरावर ती त्या झाकणाला लटकलेली होती. मी जेव्हा तिला बघितले तेव्हा त्या अडकलेल्या परिस्थितीतून सुटका करुन घेण्याच्या तिच्या क्षमता संपलेल्या होत्या. मी जवळ गेल्यावर तिने पुन्हा तडफड करण्याचा प्रयत्न केला. माणसांचा हिंस्त्रपणा सर्वांनाच माहीत