Posts

Showing posts from March, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 28.03.23

Image
दोन कान व एक तोंड असे म्हणतात की परमेश्वराने आपल्या शरीराची जी रचना केली आहे त्यामधे लपलेले संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे . जसे प्रत्येकाला एक तोंड आणि दोन कान दिले आहेत ज्याचा संकेत असा आहे की आपण जेवढे बोलतो त्याच्या पेक्षा किमान दुप्पट ऐकले पाहिजे . ऐकणे हा एक अत्यंत प्रभावी गुण मानल्या जातो . यामधे शरीररचनेची आणखी एक गंमत सांगता येईल . आपले दोन्हीही कान जर एकत्र जोडले तर त्याचा आकार आपल्या ह्रदयासारखा बनतो . याचा अर्थ असा की आपण जे काही ऐकतो ते ह्रदयापर्यंत पोहोचले पाहीजे . यासोबतच आणखी एक मजेदार परंतू सत्य गोष्ट बघा . आपले शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनलेले असते म्हणजे शरीरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते . शरीराला इजा झाली तर त्यातून रक्त बाहेर येते . परंतू याउलट , ह्रदय हे संपुर्णपणे रक्ताने व्यापलेले असते पण ह्रदयाला वेदना झाल्या की पाणी बाहेर येते … अश्रुंच्या रुपाने !! असेच अश्रू त्याच्या डोळ्यातून ओघळले होते जेव्हा तो माझ्याशी बोलण्यास आल

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

Image
तेजस्विनी ते तेजस्वी वाक्य बोलून ती माझी विद्यार्थिनी जेव्हा माझ्या कक्षातून बाहेर पडली तेव्हा मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीलो . स्विकारण्याची तयारी असेल तर एखादी साधी व्यक्ती देखील आपल्याला जीवनाचे अमुल्य धडे देऊ शकते . बी . ए . द्वितीय वर्षाला शिकणारी ती एक सामान्य कुटुंबातील दिसणारी माझी विद्यार्थिनी मला त्या दिवशी जीवनातील एक मोठा धडा देऊन गेली , तो म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी होता होईस्तोवर स्वाभिमान टिकविण्याचा प्रयत्न करावा व जमेल ते प्रामाणिक प्रयास करून आपली सच्ची सक्षमता सिद्ध करावी . हे फार कमी लोकांना जमते . मुळातच सहनशक्तीच्या मर्यादा एवढ्या आकुंचन पावताना दिसतात की लगेच एक तर परिस्थितीला शरण जाणे किंवा मग आक्रमकतेने सारे उडवून लावणे हे दोनच पर्याय निवडले जातात . परंतू अत्यंत संयमित पद्धतीने जीवनातील अडचणींचा सामना करणारी ती तेजस्विनी खरोखरीच पथदर्शकच ठरते .  मागील वर्षीची दोन हजार रुपये फी तिच्याकडे शिल्लक होती . आता येत्या सेमि