थोडा है थोडे की जरुरत है @21.05.19
हास्यक्षण निर्मीती नाटकाच्या प्रयोगाला आधीच तिकीट काढले असल्याने आम्ही जरा आरामात पोहोचलो . आजकाल ऑनलाईन व्यवहार होत असल्याने ही सोय चांगली झाली आहे . आपल्याला केवळ बुकींग नाही तर प्रेक्षागृहातील आसन देखील निवडून ठेवता येते . प्रेक्षागृहावर प्रचंड गर्दी होती . आयोजकांच्या मागे अनेकांचा तगादा सुरु होता . परंतू हतबल होऊन ते एकही आसन शिल्लक नाही असे सांगत होते . एकंदरीत शो हाऊसफुल होता . अर्थात या नाटकासंदर्भात प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद राहील हा अंदाज होताच . कारण हे नाटक होते एका अत्यंत प्रफुल्लीत , हरहुन्नरी आणि खळखळून हसायला लावणाऱ्या नटाचे . त्याचे नाव प्रशांत दामले . प्रशांद दामले यांनी अभिनय केलेल्या अनेक नाटकांपैकी एक अत्यंत उल्लेखनीय नाटक म्हणजे एका लग्नाची गोष्ट . साधारण वीस वर्षांपूर्वी प्रशांत दामले व कविता लाड या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला या नाटकातील त्यांच्या मन्या - मनी या भुमिकांमुळे वेड लावले होते . सर्वसामान्य कुटुंबामधे तुमच्या माझ्या घरी घडावी अशी ए...