Posts

Showing posts from April, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 27.04.21

Image
कम्फर्ट झोन एका घरी आई - बाबा आणि मुलांमधे जरासा वाद सुरु होता . आई - बाबा एका बाजूने तर मुले दुसऱ्या . वडीलांच्या मित्राकडे एक कार्यक्रम होता . त्याच्या वडीलांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम . तो मित्र फार जवळचा असल्याने यांच्या संपुर्ण परीवाराला निमंत्रण दिले होते . त्या करीता तो मित्र व त्याची बायको घरी येऊन आग्रहपूर्वक सर्वांना सांगून गेले होते . कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी मात्र या घरी समारंभाला जाण्यावरुन वाद सुरु झाला . मुलांनी सकाळीच सांगितले की आम्ही तुमच्या सोबत येणार नाही . आम्ही तेथे येऊन काय करायचे ? आम्हाला बोअर होईल . आमच्या ओळखीचे कुणीच नाही . आम्ही दोन तास तेथे काय करायचे ते सांगा . आम्ही कुणाशी बोलायचे . तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमधे रहाल व आम्ही काय करायचे मग ? आमच्या ओळखीचे कुणी असते तर आम्ही आलो असतो . मुलांनी बराच विरोध केला तेव्हा सुरुवातीला बाबांनी समजाविण्याचा प्रयत्न केला . अरे आपल्या सगळ्यांना बोलावले आहे . त्या दिवशी काका - काकू घरी येऊन सां