Posts

Showing posts from June, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @27.06.23

मेट्रीक्स ब्रेकींग ( ४ ) गेल्या तीन लेखांमधे आपण आपल्या अवती भोवती घोंगावणाऱ्या एका नव्या धोक्याबद्दल बोलत आहोत . आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या आधारे आपले जग अख्खेच्या अख्खे बदलणार आहे . हे लेख प्रकाशित होत असताना काही जाणकार वाचकांनी मला आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचे काय काय फायदे होणार आहेत याबाबत काही माहिती पाठविली . त्या संपुर्ण माहितीशी मी सहमत आहेच . उलट काल परवाच गुगलचे प्रमुख सुंदर पिचई यांनी गुगल मेडीकल क्षेत्रामधे आता आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या भरवश्यावर एक क्रांती करणार आहे असे घोषित केले आहे . त्यांनी माणसाच्या रेटीनाचा अभ्यास केला व त्याद्वारे असे लक्षात आले आहे की माणसाला जडणाऱ्या विविध व्याधींचा परीणाम हा त्याच्या रेटीनावर होतो व भविष्यात जडणाऱ्या व्याधींचे देखील परीणाम रेटीनावर दिसतात . त्यांच्या या संशोधनाद्वारे आता येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला जर भविष्यात ह्रदयविकार होण्याची शक्यता असेल तर त्याच्या रेटीनावर तसे बदल दिसू शकतात . जेणेकरून तो आजार टाळला

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.06.23

Image
मेट्रीक्स एम्पॉवरींग ( ३ ) मागच्या शतकात येऊन गेलेल्या मेट्रीक्स नावाच्या सिनेमातील एका अद्भुत संकल्पनेबद्दल आपण सध्या चर्चा करतो आहे आणि त्यावेळी फॅन्टसी वाटणारी ती संकल्पना खरी होते की काय अश्या भितीच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत . आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या एका नव्या मायाजाळात आपण अडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे . आपल्या शारीरिकच नव्हे तर मानसिक क्षमतांवर देखील आता यंत्र आरुढ होण्याची स्थिती निर्माण होते आहे . याचे एकच उदाहरण खालील प्रमाणे .. पाचव्या वर्गातल्या मुलाला इंग्रजीमधे मदर म्हणजेच आई या विषयावर मॅडम निबंध लिहायला सांगतात . त्या त्याला मॅडम निबंध कसा लिहायचा , त्याची सुरुवात कशी करायची , त्यामधे विषयाची मांडणी कशी करायची , सोबतच आई सारख्या विषयावर निबंध लिहीताना आईचे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे स्थान या सर्व बाबींबद्दल माहिती देतात . चांगल्या मॅडम असल्या तर त्या मुलांना सांगतात की आज घरी जायचे , घरी आपली आई आपल्या परीवाराकरीता आणि विशेषतः तुमच्य