Posts

Showing posts from July, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 01.08.23

Image
तुम इतना जो …  कवी मंडळींचे मला नेहेमीच कौतुक वाटते . सुदैवाने साहित्याचा अभ्यासक बनून राहण्याची संधी परमेश्वराने दिली असल्याने अनेक कवींच्या वेगवेगळ्या कविता वाचण्याची संधी मिळते . माणसाच्या मनाचे किती यथार्थ वर्णन कवी करतात . परवा रेडीओवर अनेक वेळा ऐकलेले एक सुंदर गाणे पुन्हा ऐकण्यात आले . कैफी आझमी यांनी लिहीलेल्या त्या गाण्याच्या ओळी सारख्या मनात रुंजू घालत आहेत . तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। क्या ग़म है जिसको छुपा रहे हो॥ किती सुरेख वर्णन आहे . एखाद्या हसऱ्या चेहेऱ्यामागचे दुःख समजून घेणे ही किती मोठी पात्रता आहे एखाद्या सुरेख नात्याची . कधी कधी आयुष्यभर सोबत राहुनही नात्यांमधे नेमके काय अपेक्षित आहे हे न कळल्यामुळे नाते दुरावलेली अनेक उदाहरणे आपण बघतो . परंतू या ओळींमधे केलेले वर्णन हे एका अत्यंत संवेदनशील मनाचे चित्रण आहे . एखाद्याला समजून घ्यायचे तर ते या पातळीपर्यंत की ती व्यक्ती जगाच्या दृष्टीने हसत असेल तरी ते हसणे म्हणजे कोणती तरी वेदना ल

थोडा है थोडे की जरुरत है @ 25.07.23

Image
मुव्ह ऑन तू मुव्ह ऑन करायला हवे . तो एकमेव पर्याय आहे या सर्व गोष्टींवर . हे बघ , मला मान्य आहे की त्या व्यक्तीचे तुझ्या आयुष्यात फारच महत्वाचे स्थान आहे . त्याच्या सहवासामधे घालविलेले सारे क्षण हे तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामधील सर्वोत्तम क्षण होते . ज्या पद्धतीचे नाते तुम्ही दोघांनीही अनुभवले ते खरोखरीच छान होते . परंतू काही कारणांमुळे आता त्या नात्यामधे तुला अपेक्षित असे प्रेम उरलेले नाही . तुला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही . याची तुला जी कारणे वाटतात ती तू मला सांगितलीस व ती सारी मला पटलेली आहेत . अर्थात या नात्याची दुसरी बाजू त्या दुसऱ्या व्यक्तीकडून मी अद्याप ऐकलेली नाही . परंतू तू माझा पेशंट असल्याने मी तुझीच बाजू समजून तुला काही गोष्टी सांगतोय ज्या तू ऐक व त्यानंतर निर्णय घे . मी फक्त मार्ग दाखविणार . निर्णय तुलाच करायचा आहे . नाते विस्कळित झाल्याने मनाने कोलमडून गेलेला एक तरुण माझ्यासमोर बसला होता . मनापासून त्याने ते नाते जपण्याचा प्रयत्न केला होता