थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18
आनंदहेतूच्या मागण्या दोन्ही घरांमधे ट्रीपला जायचे ठरल्यापासून त्या घरांतील वातावरण बदलून गेले होते . प्रत्येकाची स्वतंत्रपणे तयारी सुरु झाली होती . बॅगा , कपडे , एरवी वापरता न येणारे परंतू ट्रीपमधे घातले तर चालतील असे कपडे अश्या साऱ्या तयारी सुरु झाल्या . सोबत खायला काय काय न्यायचे याची व्यवस्था सुरु झाली . पोरांची तर वेगळीच गंमत होती . समुद्रकिनारी जाणार असल्याने तेथे काय काय धमाल करायची आहे याची लिस्ट तयार होत होती व त्यानुसार त्यांचे खेळांचे साहित्य सोबत घेणे सुरु होते . बदलत्या काळानुसार पोरांनी प्रत्येकाची आवड असलेली स्वतंत्र गाण्याची प्ले - लीस्ट बनवून ती गाणी पेन ड्राईव्ह व आईच्या मोबाईल मधे टाकून घेतली होती . आईच्या मोबाईलवर तसेही मुलांचा अधिकार असतो . बाबांजवळ त्यांचे लाड चालत नाहीत . या सगळ्या तयारीच्या गर्दीत बाबांचे कोणकोणत्या गावांना जायचे , कसे जायचे , त्या त्या ठिकाणचे बुकींग वगैरे सारे बघणे सुरु होते . एकंदरीत प्रवास म्हणला की सारेच ठरवावे लागते व प्र...