Posts

Showing posts with the label अंगाई

थोडा है थोडे की जरुरत है @ 09.02.21

Image
अंगाई कधी कधी काही योगायोग घडतात . असाच एक योगायोग त्या दिवशी माझ्या बाबतीत घडला . जेवण आटोपल्यावर मी निवांत गाणी ऐकत बसलो असता माझ्या प्लेलीस्ट मधे मला फार आवडणारे एक गाणे सुरु झाले . लताबाईंनी गायलेली प्रसिद्ध अंगाई . जिजाबाई आपल्या शिवबाला झोपविताना म्हणणारी , गुणी बाळ असा जागसी कारे वाया , नीज रे नीज शिवराया . लताबाईंच्या कातर आवाजात रात्रीच्या वेळी ते गाणे आणखीनच मनाला भावत होते . आईचे आपल्या बाळाला झोपविणे . जिच्यामुळे त्या बाळाला सजीव अस्तित्व लाभलेले असते व बाळाच्या त्या अस्तित्वाचा सर्वात सक्षम धागा असलेली माऊली जेव्हा दिवसभर राब राब राबून देखील पाठ आडवी न करता त्या तान्हुल्याला निजवित असते हे दृष्यच मुळी जगातील सर्वोत्तम समर्पणाचे दृष्य आहे . लताबाईंच्या दैवी सुरांसोबत हे दृष्य डोळ्यासमोर तरळत असतानाच अचानक गाणे बंद झाले व एका मित्राचा फोन आला . रात्रीचे साधारण दहा वाजले होते . यावेळी त्याचा फोन म्हणजे बहुदा त्याला काही महत्वाचे काम असणार असे मला वाट...