My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
समारंभ..पद्धत महत्वाची की आनंद?
आपल्यापैकी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या समारंभामधे सहभागी होत असतो. समारंभांमधे सहभागी होणे आपल्यापैकी प्रत्येकालाच मनापासून आवडत असते. कारण समारंभांमधून अनेकांच्या भेटी होतात, गप्पा होतात ज्या एरवी कामाच्या रगाड्यात राहून गेलेल्या असतात. म्हणूनच समारंभ हे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. अर्थात हीच पद्धत जगभरात आहे. किंबहुना समारंभ साजरे करण्यामागील खरी भूमिका देखील तीच असते. परंतू कधी कधी या समारंभ साजरे करण्याच्या पद्धतींमुळे समारंभ किती तणावग्रस्त होऊ शकतात याचा अनुभव नुकताच मी एका लग्न समारंभात घेतला. समारंभातील पद्धतींवरुन दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला जाऊन तो समारंभच रद्द होतो की काय असे वाटू लागले. सुदैवाने तसे झाले नाही परंतू सर्वांची एकमेकांबद्दल मने मात्र कलुषित झाली आणि ज्या दोन जीवांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती ती दोघे कावरी बावरी होऊन विषण्ण मनाने तो सारा प्रकार बघत राहीली. ते सारे बघून मला एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न पडला. समारंभामधे पद्धत महत्वाची की आनंद? सामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर आनंद हेच असायला हवे. परंतू समारंभ पद्धतीवरुन प्रतिष्ठा पणाला लावणारे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. अश्याच काही विशेष (?) लोकांनी त्या दिवशी त्या लग्न समारंभात अक्षरशः धुडगुस घातला होता. या सर्व प्रकाराची सुरुवात वरपक्षाकडील मंडळी लग्नस्थळी पोहोताच झाली. मी वरपक्षाकडून या लग्नात सहभागी झालो होतो.
वरात दारात पोहोचल्यावर वरपक्षाच्या मंडळींचे स्वागत करण्यात आले. सर्वांचा हार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. तेव्हड्यात जावायाचे वडील तो हार बघून म्हणाले, काय हार आणले? असले हार तर आमच्याकडे अंत्यदर्शनासाठी आणले जातात. समारंभाची अशी सुरुवात झाली. त्या वयस्कर माणसाचे वय खरे तर तश्याच प्रकारचा हार घालण्याचे झाले होते परंतू तिरकसपणे बोलून आपले महत्व वाढविणे ही काही मंडळींची खासीयत असते. त्यांच्या त्या उद्गारांना आणखी काही जणांनी अकारण पुष्टी जोडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. परंतू सुदैवाने त्या वाक्याला समोरच्या पक्षाकडून उत्तर देण्यात आले नाही. परंतू असे जास्त ऐकून घ्यायचे नाही असा त्यांचाही मानस झाला असावा कारण सिमांत पुजनाच्या कार्यक्रमात त्याचा परीचय आलाच. वरपक्षाकडील मंडळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वतंत्र भटजी घेऊन आले होते. त्यांना त्यांच्या पद्धतीने समारंभ करायचा होता. वधुपक्षाकडूनही एक वेगळे भटजी होते कारण त्यांनाही त्यांची पद्धत राखायची होती. त्या दोन्ही भटजींमधे विविध गोष्टींवरुन मतभेद होते. दिशांबद्दल, वस्तूंबद्दल, इतकेच काय परंतू वधूने चौरंगावर बसायचे कसे यावरुन देखील मतमतांतरे होती. वधू छान तयार होऊन, लाजत त्या चौरंगापाशी उभी होती व चौरंगावर पहिले कोणता पाय ठेवायचा यावरुन वाद सुरु झाला. दोन्ही कडील ज्येष्ठ मंडळी आपल्या अनुभवांचे कसब पणाला लावून आपले म्हणणे कसे बरोबर आहे याबाबत चर्चा करु लागले. तोवर ती वधू बिचारी उभा राहीली. मला तर सहजच वाटून गेले की तिला म्हणावे, टुणकन् उडी मारुन दोन्ही पाय टेकव आणि बस चौरंगावर. इतक्या सामान्य बाबीवरुन देखील वाद होऊ लागले. अमुक गोष्ट उत्तरेकडे की दक्षिणेकडे, उजवीकडून की डावीकडून, ओवाळताना पहिले कुणाला ओवाळायचे, अहेराचा पहिला मान कुणाचा, ओवाळण्या करण्यासाठी पाच प्रमुख महिलांमधे पोराच्या चुलतमामीला बोलाविले नाही म्हणून ती मामी व तिचा नवरा रुसून आपल्या खोलीत निघून गेले, दोन्ही कडील मंडळींची ओळख भेट करताना चुलत जावायांना पहिले बोलाविले व नंतर सख्खे जावाई बोलाविण्यात आले, भेटीच्या वेळी पहिले नारळ हातात द्यायचे की पहिले कुंकु लावायचे, असल्या अनेक बाबतीत त्या ठिकाणी वादविवाद होऊ लागले. खरे तर ती सुरुवातच होती. लग्नाचा दिवस तर पार पडायचा होता. कार्यक्रम आटोपल्यावर दोन्ही कडील मंडळींची आपापल्या गटांमधे चर्चा सुरु झाली. विरुद्ध गट (आता विरुद्ध शब्द चपखल बसत होता) कसा विचित्र आहे व परंपरा आणि पद्धती त्यांना कश्या माहित नाहीत याबद्दल दोन्हीही गटांचे एकमेकांबद्दल (कटू) एकमत झाले. उद्या मात्र आपण अजिबात चालू द्यायचे नाही व आपल्याच पद्धतीने सारे काही करुन घ्यायचे असा चंग दोन्ही कडील मंडळींनी बांधल. या निर्धाराचा परीचय दिवसभर त्या लग्नमंडपात वारंवार उडणाऱ्या खटक्यांवरुन, वादांवरुन, रुसव्या फुगव्यांवरुन, अहेरावरुन होत राहीला. या सर्व प्रकारात वधुचे मामा, जावाई व वराची आई, त्याची बहिण व दुरचे परंतू यावेळी सर्व सूत्र हातात घेतलेले काका यांचा मोठा सहभाग होता. कोणत्याही कारणावरुन वाद व टोकाचे भांडण त्यांनी सुरु केले. या सर्व प्रकारात ज्यांच्यामुळे हा समारंभ घडून येत होता, ज्यांच्या सहजीवनाची सुरेख सुरुवात होणार होती ते दोघेही केवळ कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे वावरत होते व मिळणाऱ्या अगम्य सूचनांचे निमूटपणे पालन करीत होते. या सर्व भांडणांनंतरही लग्न लागले व विहीणबाईंच्या पंगतीची वेळ झाली. सुग्रास पंचपक्वान्ने वाढण्यात आली. पंगतीमधे छान रांगोळ्या वगैरे काढण्यात आल्या सर्वजण जेवायला बसले. गरमागरम अन्न वाढण्यात आले. विहीणबाईंचा मान म्हणून त्यांना सर्वप्रथम जेवण सुरु करण्यास सांगण्यात आले... आणि अचानक काय झाले कुणास ठाऊक? विहीणबाई पानावरुन उठल्या, रागाने त्यांनी वधुपक्षातील काही मंडळींकडे करडा कटाक्ष टाकून - माझा अपमानच करायचा होता तर मग पोरीचे लग्न कशाला करायला काढले - असे स्फोटक वाक्य उच्चारले व त्या थेट आपल्या खोलीत जाऊन बसल्या. मी वरपक्षाकडून असल्याने त्याच पंगतीत जेवायला बसलो होतो. गरम पुरणपोळीचा घास तोडून मी त्याचा आस्वाद घेणार इतक्यातच हा प्रसंग घडला. नाईलाजाने मला तो घास तसाच खाली ठेवावा लागला. पंगत खोळंबली. वरमायेचा अपमान कश्यामुळे झाला हे कळलेच नाही. काही मंडळी त्या खोलीकडे धावली. काय झाले हे कळायला थोडा वेळ लागला पण मग खरा प्रकार कळल्यावर हसावे की रडावे ते कळेना. वरमायेला पंगतीसाठी आणताना तिच्या डोक्यावर कार्ल्याचा वेल धरला नव्हता व त्यामुळे सगळा अनर्थ झाला होता. लगेच वधुपक्षाकडील एक पोरगा गाडी घेऊन पिटाळण्यात आला. कार्ल्याचा एक वेल कुठुनसा मिळविण्यात आला व तो डोक्यावर धरुन वरमायेची स्वारी परत पंगतीमधे हजर झाली व पाऊण तासानंतर तो गार झालेला पुरणाच्या पोळीचा घास मला खाता आला. या सर्व प्रकारामुळे अत्यंत नीरस व अनुत्साही वातावरणात कसेबसे जेवण पार पडले. वर-वधुने यांत्रीकपणे एकमेकांना घास भरविले व यांत्रीकपणेच उखाणे देखील घेतले. या वागण्याचा बदला म्हणून परत निघताना वरपक्षाकडील कुणाचेही सामान गाडीत ठेवण्यासाठी वगैरे वधुपक्षाकडील कुणीही आले नाही. मने इतकी कलुषित झाली होती की मुलीला निरोप देण्यासाठी केवळ तिचे आई-बाबा व एक मावशी इतकेच लोक आले. असल्या मंडळींची तोंडेही बघायची नाहीत असे म्हणून वधूपक्षाकडील तथाकथित धुरीण मांडवातच थांबले तर यांच्या लोकांना तोंड दाखवायला जागाच नाही असे म्हणून आपण बाजी मारली या थाटात वरपक्षाकडील धुरीण बोलून गेले. वरात निघताना त्या बिचाऱ्या नववधुला रडू देखील येत नव्हते कारण आधल्या दिवसापासून पद्धतीच्या नावाने सुरु असलेल्या तमाशामुळे तिचे भरपूर रडून झाले होते. गाडी निघाली. वरपक्षाकडील मंडळींच्या गप्पा सुरु झाल्या. ते नविन जोडपे मात्र खिन्न होऊन या सर्व प्रकारामधे एकमेकांना शोधत राहीले. शोध लागलाच नाही. केवळ पद्धतीच कळल्या.
समारंभामधील परंपरागत पद्धतींच्या नावाखाली संपुर्ण आनंद हिरावून घेण्याचे प्रकार या आधुनिक काळातही घडताना दिसतात. कालबाह्य झालेल्या अनेक गोष्टी केवळ काही परंपरा धुरीणांच्या मनाला बरे वाटते म्हणून पाळण्याचा दुराग्रह आनंद निर्माण करण्या प्रक्रीयेस बाधा पोहोचवितो. या सर्व परंपरांच्या पाईकांनी स्वतः सर्व गोष्टी कराव्यात परंतू समारंभांमधील आनंद हिरावून इतरांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नाही. आपल्या संस्कृतीमधे प्रत्येक समारंभामागील मूळसूत्र -आनंद निर्माण व्हावा, एकत्रीत आल्याने एकोपा वाढावा, मने जोडली जावी व त्या द्वारे समाजातील सर्वांमधे प्रेमाची दृढता व्हावी- हेच आहे. ते सर्व बाजूला सारुन वेगवेगळ्या पद्धती पाळण्याच्या दुराग्रहास कंटाळून नवी पिढी सर्व समारंभांनाच फाटा देऊन सर्व काही उडवून लावण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुराग्रही परंपरावाद्यांना आनंद होईल की ते या उडवून लावण्याच्या पद्धतीचीही चिकित्सा करतील?
Kiti bore lokanchya sahavaasat astaa tumhi Dr.
ReplyDeleteKiti bore lokanchya sahavaasat astaa tumhi Dr.
ReplyDeleteHemant, sometimes we don't get choice of choosing our associations, we have to accept it but if you take it positively then they also teach us how we should not be in our life..😊😊
ReplyDeleteBaobar aahe sir .anekda n patnarya gosti karvya .lagtat. Kevel lok kay mhantil kinva mulakadche khush vave hech pahile jate .june te saglech changle ase n mhanta navin pan swikarle pahije ase vatte. Mhunch asha vichranchi garaj aahe .uttam lekh sir!
ReplyDelete💤💤💤💤💤
ReplyDelete☁☁☁💤☁
☁☁💤☁☁
☁💤☁☁☁
💤💤💤💤💤☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
☁🎈🎈☁🎈🎈☁
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
☁🎈🎈🎈🎈🎈☁
☁☁🎈🎈🎈☁☁
☁☁☁🎈☁☁☁
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
✨💎💎✨💎💎✨
💎💎💎💎💎💎💎
💎💎💎💎💎💎💎
✨💎💎💎💎💎✨
✨✨💎💎💎✨✨
✨✨✨💎✨✨✨
😀😀😀😀😀😀😀😀😀😇😀
☁ Sleepy ☁