थोडा है थोडे की जरुरत है @13.11.18

पाडवा...आठवांचा!

आज त्या चिमुरडीला काय झाले होते काही कळत नव्हते. नेहमी धमाल करणारी आणि सारा गोंधळ घालणारी ती पोर आज मात्र पाळण्यावर एकटीच बसली होती. एखादे खूप उड्या मारणारे आणि मजेदार आवाज करणारे एखादे खेळणे त्याच्यातील बॅटरी अभावी शांत होऊन जाते ना, अगदी तसे. एरवी तिच्या गोंधळ करण्याच्या कल्पकतेला सारेच त्रासलेले असतात. वेगवेगळ्या भन्नाट कल्पना तिच्या डोक्यातून निघतात. आणि मग त्या कल्पना पूर्ण करण्यासाठी ती चिमुरडी घरातील कोणती गोष्ट घेईल काही नेमच नाही. घरभर नुसता पसाराच पसारा. तिच्या त्या कल्पकतेचे कौतुक करताना कधी कधी तिची आई, तिची आजी चिडून जातात कारण या छोट्या बाईसाहेब पसारा करुन नव्या कल्पकतेने नविनच काहीतरी करण्यासाठी पसार झालेल्या असतात आणि त्यांच्या कल्पकतेच्या सादरीकरणानंतरची आवरासावर आईला किंवा आजीला करावी लागते. एकंदरीत तिच्या असण्याने घर दणाणून जाते. एकाच वेळी चित्रकार, नाटककार, दिग्दर्शक, कथाकार असे सारे मंडळी तिच्यात शिरलेले असतात मग इतक्या सर्व कलाप्रेमी मंडळींचा शिरकाव त्या पिटुकल्या देहात झाल्यावर तर काय, ती अक्षरशः धुमाकुळ घालते. परंतू त्या धुमाकुळ घालण्यातुन ती विकसीतही होते आहे त्यामुळे तिला तिच्या मनाप्रमाणे सारे करु दिले जाते. तिच्या या अश्या अतिव्यस्ततेमुळे सारे घर ती कायमच दणाणून टाकत असते. आज मात्र दिवाळीच्या दिवशी, ऐन पाडव्याला हिचे काहीतरी बिघडले होते. सर्वांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. कारण तिच्या गोंधळ घालण्याने थोडा फार त्रास होत असला तरी देखील तिच्यामुळे घरात चैतन्य राहते हे साऱ्यांना मान्यच होते. त्यामुळेच कायम बडबड करणारी ही बबडी अशी का बसली याचे सर्वांनाच आश्चर्य होते. तिला प्रत्येकाने विचारले, वेगवेगळ्या गोष्टी सांगून बघितल्या, आपण चॉकलेट आणू, फिरायला जाऊ किंवा काय काय. परंतू आज कोणत्याही प्रलोभनाचा त्या पोरीवर परीणाम होत नव्हता. ती आपली फुरंगटून बसली होती. बऱ्याच वेळानंतर मात्र मनातले दुःख सहन झाल्याने तिने हंबरडाच फोडला. रडताना तिने जे वाक्य उच्चारले त्याने मात्र प्रत्येकाच्या ह्रदयात चर्र झाले. एका छोट्याश्या चिमुरडीलाही असे काही वाटू शकते ती तसा विचार करुन तिच्या इवल्याश्या मनाला देखील खूप साऱ्या वेदना होऊ शकतात हे कुणाला कळलेच नव्हते

बरेचवेळा संवेदना या केवळ मोठ्या झालेल्या लोकांच्याच तिव्र असतात असा गैरसमज समाजात असतो. लहान मुलांना तर काही फार कळत नाही. माणसाला जिवनाचा अनुभव मिळाल्यानंतरच काही गोष्टी कळतात. अनुभवच बऱ्याच गोष्टी शिकवित राहतो. आमचे केस उन्हात नाही पांढरे झाले वगैरे सारख्या घोषणाही केल्या जातात. परंतू खरे बघता मनाच्या संवेदनशीलतेचा आणि वयाचा तसा फार संबंध नाही. वय वाढले असूनही आपल्याच विचारांना कवटाळून, जगात सर्वात जास्त केवळ मलाच कळते असे समजून, माझीच विचार करण्याची दिशा योग्य आहे इतरांनी केवळ त्याचे पालनच करावे असे ठामपणे सांगून सांगून समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करणारे असंवेदनशील वयस्कर आपल्याला बरेच वेळा दिसतात. या अश्या मंडळींच्या मनातच सर्वप्रथम पोरांना काय कळते असा विचार येतो. परंतू संवेदनशील मन ही जन्मापासून काही जणांकडे असलेली सुंदर बाब असते. संवेदनशील मनाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते आपल्यासोबत इतरांच्या मनाला समजून घेण्याचा विचार निर्माण करते सोबतच व्यक्तित्वाची भावनिक बाजू सक्षम ठेवते. उलटपक्षी मुलांच्या मनामधे या भावनिक संवेदना फार तीव्र असतात. केवळ अडचण ही होते की ती पोरे त्यांना योग्य पद्धतीने व्यक्त करु शकत नाहीत. पण म्हणून त्यांचे भावनिक विश्व समृद्ध नसेल असे समजण्याचे काही कारण नाही. त्या पिटुकलीला देखील तिला नेमके काय होतंय ते सांगता येत नव्हते म्हणूनच पाडव्याच्या दिवशी तिने तोंड पाडून पाळण्यावर बसणे हे तिच्या मनातील वेदनेचेच प्रकटीकरण होते. परंतू फारच झाल्यानंतर तिने हंबरडा फोडला रडत रडतच तिने सर्वांना सांगितले, मला माझ्या बाबांची आठवण येतेय

नोकरीनिमीत्त दूर असलेला तिचा बाबा सणाच्या दिवशी घरी नाही म्हणून सर्वांनाच वाईट वाटत होते. त्याची आठवण येत होतीच. तो असला की काय काय धमाल होते, तो काय काय करतो वगैरे साऱ्या गोष्टी बरेचवेळा बोलून झाल्या होत्या. पण त्या चिमुकलीला देखील तिच्या बाबांचे अश्या पाडव्याच्या दिवशी तिच्यापासून दूर असणे मनात सलत असेल असा विचार मात्र कुणाच्याही मनात आला नाही. पोरांचे काय, ते रमून जातात खेळण्यामधे वगैरे. कठीण तर मोठ्यांना जाते, पोरांचे त्या मानाने बरे आहे, अशी मुलांबद्दलची समजूत त्या पोरीने खोटी ठरविली. दिवाळीच्या पाडव्याला बाबाला ओवाळणे, बाबाच्या डोक्याला तेल लावून देणे, मग बाबाकडून छाव ओवाळणी किंवा गिफ्ट घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासोबत रहाणे हे सारे ती खूप जास्त मिस करीत होती. आपल्या बाबाच्या पाडव्याच्या दिवशी नसण्याने खिन्न झालेली पोर एका खऱ्या खुऱ्या संवेदनशील मनाचे प्रतिकच होती. आणि तिचा बाबा त्याचीही अवस्था तशीच होती. त्याचेही तर लक्ष लागत नव्हते, दूर देशात.

त्या दूर देशात तिचा बाबा देखील तिच्या इतकाच गहिवरुन गेला होता. त्यालाही पाडव्याला आपल्या चिमुकली कडून ओवाळून घ्यायचे होते, तिची खोडी काढायची होती, तिच्यासोबत खेळायचे होते, तिला हसवायचे होते, तिला चिडवायचे होते, तिला तिच्या आवडीची भेटवस्तू द्यायची होती आणि त्या भेटवस्तूचा पॅकींग पेपर काढल्यावर आनंदयुक्त आश्चर्याने तिच्या डोळ्यात आलेली चमक बघून त्याला धन्य धन्य व्हायचे होते. पण त्यालाही ते काहीही शक्य नव्हते. या पिटूकली सारखा हंबरडा फोडता येत नव्हता परंतू त्याच्याही डोळ्यात दोन आसवे होती

बरेच वेळा नोकरीच्या निमित्ताने परीवारापासून दूर रहावे लागते. परदेशातील नोकऱ्यांमुळे पैसा देखील मिळतो. तो कमावणे देखील कधीकधी फारच गरजेचे असते. परंतू या सर्व प्रकारात नेमकी आपल्या सणांना सुटी मिळाल्यामुळे घरापासून एखाद्या अश्या चिमुकलीपासून दूर राहीलेल्या बाबाचे मन समजून घेणारी एक कविता माझ्या वाचनात आली. बाबांपासून दूर राहणाऱ्या पिटूकलीला आणि त्या पिटुकलीपासून दूरवर असलेल्या तिच्या बाबांना, या दोघांनाही आपल्याला या कवितेच्या निमीत्ताने समजून घेता यायला हवे. कवितेतील एक चिमुरडी म्हणते,

बाबा, नन्हे कदम जब मेरे लडखडाये थे, तब झट से मुझे अपने कांधोपर बिठाकर सारा जहाँ आप घुमाते थे,

आज उन काँधो का बोझ हलका सा हुवा है, क्योंकी उन कदमों मे चलने की ताकद सी गयी है,

बाबा, आज यही कहुंगी आपसे की हर रोज आपकी याद बहोत आती है!!

आपके हाथोंसे खाना खाने के मजे कुछ और ही हुवा करते थे, आपकी लोरी सुनकर वो निंदवाले ख्वाब बडे खुबसुरत हुवा करते थे,

आज आपकी बस एक डाँट खाने को मन तरसता है और आँखे नम हो जाती है, आज बिना आपकी लोरी सुने वो ख्वाबोंवाली निंद भी बहोत कम आती है,

बाबा, आज यही कहुंगी आपसे की हर रोज आपकी याद बहोत आती है!!

आपके बिना यहाँ मन नही लगता और बहोत कुछ अधुरा सा लगता है, आजकल आपका हर पल मेरे साथ होना जरुरी लगता है,

आज भी मेरे कदम लडखडायें तो घबराहटसी होती है, मगर आप दूर होकर भी मेरा हाथ पकड लेते हो इस बात के विश्वास से राहत सी मिलती है,

बाबा, आज यही कहुंगी आपसे की हर रोज आपकी याद बहोत आती है!! 

(कविता लेखन: कु. अनन्या अविनाश मोहरील, पुणे)







Comments

  1. 👌 सुंदर कविता ... 👍 अनन्या

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23