थोडा है थोडे की जरुरत है @ 07.11.23

काऊंटडाऊन

दिवस होता १४ जुलै २०२३. त्या वैज्ञानिक महिलेचा आवाज ऐकू यायला लागला. सारे काही रेडी आहे. कन्फर्म. फायनल काऊंटडाऊन फॉर लॉन्च बीगीन्स. सबंध जगाचे लक्ष ज्या मोहिमेकडे लागले होते त्या महत्वाकांक्षी चांद्रयान- मोहिमेचे काऊंटडाऊन सुरु झाले. याआधीच्या मोहिमेच्या असफलतेचे ओझे स्वाभाविकपणे सर्वांच्या चेहेऱ्यांवर जाणवत होते. त्या प्रचंड मोठ्या कक्षामधे सर्वांचे लक्ष स्क्रीनवर लागले होते. कुणाच्याही तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. मनातल्या मनात प्रत्येकाचे नामस्मरण सुरु होते. त्यांच्यासोबत ती दृष्ये बघणारे करोडो लोक देखील स्तब्ध झाले होते. अनेकांच्या मनात कितीही प्रयत्न केला तरी राहून राहून मागच्या असफलतेची आठवण येतच होती. म्हणूनच यावेळी सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती. परंतू या सर्व लोकांमधे ती एकटी अशी होती की मनातले विचार बाजूला सारून धीर गंभीर आवाजात तिचे काऊंट डाऊन सुरु होते. फिफ्टी, फोर्टी-नाईन, फोर्टी-एट… 

तिच्याही मनात धाकधूक होतीच. ती देखील वैज्ञानिक होती. गेले अनेक रात्री तिचीही नीट झोप झाली नव्हती. असफलतेचा शिक्का लागलेल्या टीमचा ती देखील अविभाज्य भाग होती. प्रचंड मेहनत त्यावेळीही त्या सर्वांनीच केली होती. परंतू असफलतेला फार सोबती नसतात. यशाचे साथीदार फार असतात. म्हणूनच त्या मागच्या असफलतेचे ओझे घेऊन नव्याने चालणे फार कठीण असते. गेल्या तीन चार वर्षांचे अथक परीश्रम आता फलदृप होण्याची वेळ जवळ येऊ लागली होती. ती वेळ जवळ येत होती तिच्याच धीरगंभीर आवाजात.. ट्वेंटी पाईव्ह, ट्वेंटी फोर, ट्वेंटी थ्री

यावेळी सारी काळजी तर घेतली आहे. सारे काही बघून घेतले आहे. एकदा लॉन्च नीट झाले की पहिला टप्पा पूर्ण होईल. पुढील टप्पे कठीण आहेतच. परंतू वेल बीगन इज हाफ डन असे म्हणतात त्यामुळे आजचे प्रेशर फार जास्त होते. परंतू तिची मात्र फारच कसरत होती. हा सर्व ताण तिला तिच्या आवाजात जाणवू द्यायचा नव्हता. कारण तिला तिचे काऊंटडाऊन अगदी योग्य पद्धतीने प्रोफेशनलीच पूर्ण करायचे होते. त्याची लय, त्याचा रीदम तिला बरोबर सांभाळायचा होता. तिचा आवाज त्या मोठ्या कक्षातच नाही तर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सबंध जग ऐकत होते. देशाचे माननीय पंतप्रधान देखील आपली सारी कामे बाजूला सारून तिचाच आवाज ऐकत होते. तिच्या त्या काऊंटडाऊन मधे आकडे कमी होत होते परंतू सर्वांच्या ह्रदयाचे ठोके मात्र वाढत होते. पण अतिशय धिरोदात्त पणे ती मात्र बोलत होतीफोर, थ्री, टू, वन….लॉन्च!! तिने काऊंटडाऊन संपविल्या क्षणी स्वीच ऑन झाला चांद्रयान चंद्राकडे सफलतेने झेपावले. सबंध जगात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मागच्या वेळेच्या असफलतेचे मळभ पार धूतल्या गेले. खरे तर मोहिम फत्ते व्हायला वेळ होता परंतू पहिला टप्पा सर झाला सर्वांमधे प्रचंड उत्साह निर्माण झाला. तो सारा आनंद कार्यपूर्तीचे समाधान तिच्या काऊंटडाऊनवर सर्वांना प्राप्त झाले. एन. वलरमथी हे त्या वैज्ञानिक महिलेचे नाव. गेली काही वर्षे इस्रोच्या विविध अवकाश मोहिमांचे काऊंटडाऊन वलरमथी यांच्याच आवाजात होत होते. म्हणूनच परत एकदा चांद्रयान - ची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याचकडे देण्यात आली होती. त्यांनी त्या काऊंट डाऊनची जबाबदारी लिलया सांभाळली. अनेकांनी यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांचे अभिनंदन केले. मोहिमेचा पहिला टप्पा पार केल्याचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर झळकत होता. तुमचे काऊंटडाऊन लकी ठरले त्यामुळे पुढेही तुम्हीच हे करत चला असे देखील त्यांना निश्चित कुणी सांगितले असणार. पण त्या करीत असलेल्या काऊंटडाऊनच्या पलीकडे देखील एक फार मोठे काऊंटडाऊन सुरु होते हे त्यांना ठाऊक नव्हते. सर्वसाधारणपणे कुणाच्याच ते लक्षात नसते त्यामुळे वलरमथी त्यास अपवाद नव्हत्या

सप्टेंबर रोजी पहाटे वलरमथी यांच्या आयुष्यात असेच एक काऊंटडाऊन झाले. फाईव्ह, फोर, थ्री, टू, वनस्टॉप. वलरमथी यांचे ह्रदय बंद पडून दुःखद निधन झाले. चांद्रयान - चे काऊंटडाऊन त्यांचे शेवटचे काऊंटडाऊन ठरले.

आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या काऊंटडाऊनवर आपण वेगवेगळ्या सफलता प्राप्त करीत राहतो. यशोशिखरांना पादाक्रांत करीत पुढे पुढे जात राहतो. त्या यशाचे कधी उन्माद, कधी गर्व तर कधी शालीनता असे आविष्कारही दिसू लागतात. परंतू हे सारे काऊंटडाऊन सुरु होत असताना एक मोठा काऊंटडाऊन सातत्याने सुरु आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो थांबणार कधी हे कुणालाही आजतागायत कळले नाही. म्हणूनच आयुष्यातील छोटे छोटे काऊंटडाऊन एन्जॉय करायलाच हवेतच परंतू केवळ तेच अंतीम आहेत असे समजण्याची चूक करु नये. कारण त्या अंतीम काऊंटडाऊन मधे थ्री, टू, वननंतर लॉन्च नसतोस्टॉप असतो!!






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19