थोडा है थोडे की जरुरत है
थोडा है... थांबवूयात!!
प्रिय वाचक बंधू भगिनी, दै. हिंदुस्थान या वृत्तपत्रात मी गेली साडे सहा वर्षे सतत हे सदर चालवितो आहे. माझा मित्र विलास मराठे याच्या आग्रहावरुन तसेच विनोद मराठे, मनिषा वहिनी आणि संपुर्ण हिंदुस्थानची टीम यांच्या पाठबळामुळे मी हे सदर गेली सहा वर्षे सतत लिहू शकलो. आजतागायत माझ्या लेखातील एकही शब्द कमी न करता किंवा त्याबद्दल आक्षेप न घेता मला माझे विचार व्यक्त करण्याची जी संधी हिंदुस्थान परीवाराने दिली त्याबद्दल आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. या सदराच्या निमित्ताने अनेक वाचकांशी मी जोडल्या गेलो व माझा परीवार खूप मोठा झाला, अनेकांशी मैत्र निर्माण झाले. वाचकांनी दिलेल्या प्रेमाच्या ऋणातच मला रहायचे आहे. समाजमाध्यमे किंवा प्रत्यक्ष संवाद साधून मला अनेकांनी ज्या शुभेच्छा व आशिर्वाद दिले त्याने मी धन्य झालो. पुढच्या मंगळवारी थोडा है चा शेवटचा लेख मी सादर करीत आहे. त्यानंतर हे सदर थांबवूयात. पुन्हा पुढे एखाद्या नव्या वैचारिक संकल्पनेसह आपल्या भेटीला जरुर येईनच कारण दै. हिंदुस्थान आणि त्याचे सारे वाचक हा माझाच परीवार आहे नि मी तुमचाच आहे.
- डॉ. अविनाश भास्कर मोहरील / ९४२३१५४४४५
Comments
Post a Comment