थोडा है थोडे की जरुरत है @ 15.02.22

त्वालमंगीहा

पावसाळ्याच्या दिवसांमधे मी बरेचवेळा दुचाकी चालविताना चिखलाच्या रस्त्यावरून ती दुचाकी स्लीप होण्याचा अनुभव घेतलेला आहे. बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असणार. पावसाळ्याच्या दिवसांमधे रस्त्यावर चिखल होतो त्यामुळे गाडीच्या टायर्सना चिखल लागून ते स्लीप होऊ लागतात. अश्यावेळी गाडी चालविणे कठीण होऊन जाते. गाडीची चाके वेगळ्या दिशेने गाडी वेगळ्या दिशेने अशी स्थिती होऊन जाते. अश्यावेळी फार काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. बरेचवेळा अश्या वेळी गाडीचा तोल जाऊन दुचाकीसह लोक रस्त्यावर पडून अपघात झाल्याच्या घटना देखील आपण बघत असतो. दुचाकीवरचा हा अनुभव मी घेतला होता. परंतू चार चाकी गाडी देखील मोठ्या प्रमाणात स्लीप होऊन अक्षरशः रस्ता सोडून खाली उतरणे किंवा १८० अंशामधे फिरून जाणे हा भयंकर अनुभव मी नुकताच घेतला. एका महाविद्यालयाच्या तपासणीसाठी पूर्वांचल मधे स्थित मिझोरम या राज्याच्या एका गावी जाताना हा सारा प्रकार माझ्या बाबतीत घडला. या राज्याच्या राजधानीला म्हणजे आयझोल या गावी मी विमानाने पोहोचलो. तेथून त्या महाविद्यालयाची टीम मला घेऊन सायटल नावाच्या एका गावी नेण्यासाठी आली होती. आयझोल ते सायटल हे अंतर ७० किलोमीटर आहे. डोंगराळ रस्ता असल्याने साधारण तीन तास लागतील असा माझा अंदाज होता. परंतू माझा अंदाज पार मोडकळीस निघाला. हे ७० किलोमीटरचे अंतर पार करायला आम्हाला तब्बल तास लागले. त्याचे कारण वर उल्लेखित केल्याप्रमाणे आलेला भयानक अनुभव. परंतू त्या अनुभवामधून देखील मला मिझोरमच्या एका अद्भूत परंपरेचा परीचय झाला. त्या परंपरेचे नाव त्वालमंगीहा

आयझोलहून साधारण १५ किलोमीटर अंतर पार केल्यावर त्या डोंगर दऱ्यांमधे तयार केल्या जाणाऱ्या एका रस्त्यावर आम्ही येऊन पोहोचलो. अत्यंत चांगली वाहने आमच्यासाठी ठरविण्यात आली होती. परंतू रस्त्यांची स्थिती एवढा भयंकर होती की त्या अप्रतिम प्रतीच्या गाड्या असूनही त्या रस्त्यावर अडचण येतच होती. हा आंतरराष्ट्रीय महामार्ग बनणे सुरु आहे अशी माहिती मिळाली. निर्माणाधीन रस्ता असल्याने जागोजागी खोदकाम केलेले होते, पाऊस पडून गेला असल्यामुळे अनेक ठिकाणी चिखल जमा झाला होता. त्यामुळे अत्यंत संथगतीने सर्वच गाड्यांचा प्रवास सुरु होता. या रस्त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही प्रवासाचे साधन आयझोलच्या पुढे नसल्याने सर्वच वाहने जसे, बसेस, छोट्या गाड्या, मोठमोठे ट्रक, पेट्रोलचे टँकर्स हे सारे याच रस्त्यावरुन ये-जा करीत होते. त्यामुळे रस्त्याच्या कोणत्याही एका बाजूला एखादीही गाडी फसली तर संपुर्ण ट्रॅफीक थांबायचे. मग पुन्हा थोड्या वेळाने प्रवास सुरु व्हायचा. दुपारी तीन वाजता सुरु झालेला प्रवास तीस किलोमीटरच्या टप्प्यावर पोहोचला मला मी कधीही घेतला नव्हता तो भयंकर अनुभव मला आला. पूर्वोत्तर राज्य असल्याने सायंकाळी सहा वाजताच अंधार झाला होता. अचानक पुन्हा ट्रॅफीक थांबले होते. एका छोट्याश्या गावाजवळून हा रस्ता होता. एक मोठे म्हणजे साधारण ३०० मीटरचे एक वळण तेथे होते. त्या वळणाच्या रस्त्यावर चिखल पसरला होता त्यामुळे तो रस्ता चोपडा झाला होता. गाड्या थांबल्या म्हणून मी पुढे बघितले परंतू त्या वळणावर फार गाड्या दिसत नव्हत्या. मला कळे ना की गाड्या का थांबल्या आहेत. जेव्हा आमची गाडी पुढे सरकली तेव्हा मला तो अंदाज आला. रस्ता वळणाचा होता त्याच्या बाजूला जवळपास एक किलोमीटर खोलीची मोठी दरी होती. अगदी हळू हळू ड्रायव्हरने गाडी पुढे काढली अलगद त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. तो गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असताना गाडी उजव्या बाजुने दरीच्या दिशेने घसरायला लागली. त्याला कदाचित ती सवय असल्याने त्याने एकदम स्टेअरींग जोरात फिरविले अचानक गाडी १८० अंशामधे फिरून ज्या दिशेने आम्ही आलो होतो त्या दिशेला तोंड करून उभी झाली. ड्रायव्हरला ते करणे आवश्यक होते कारण अन्यथा ती गाडी तशीच घसरत दरीच्या दिशेने पोहोचली असती. हा प्रकार फारच नविन भितीदायक होता. रस्त्यावरून घसरून गाडी पूर्ण उलट फिरून उलट दिशेने उभी राहणे हा भयंकर प्रकार होता. एका क्षणाला तर त्या गाडीवरून ड्रायव्हरचे नियंत्रण सुटलेच होते. परंतू त्याने गाडी सावरली. आता अश्या प्रकारे प्रचंड घसरणीच्या रस्त्यावर गाडी पुढे जाणार कशी हा प्रश्न मला पडला. माझ्या सोबतचे त्या महाविद्यालयाचे प्राध्यापक ड्रायव्हर हे दोघेही मात्र शांत होते. दोन तीन मिनीटे काहीच घडले नाही. मी त्यांना विचारले की आता कसे? ते मला म्हणाले सर, काळजी करु नका, लवकरच मार्ग निघेल. आणि खरोखरीच केवळ पाचव्या मिनीटाला मला मिझोरम मधल्या त्या परंपरेचा अनुभव आला ज्यास तेथल्या भाषेमधे त्वालमंगीहा असे म्हणतात

त्वालमंगीहा म्हणजे अडी अडचणीच्या प्रसंगांमधे कुणालाही कसलाही विचार करता त्याच्याकडून प्रशस्तीपत्राची अपेक्षा करता मनापासून मदत करणे. मदतीसाठी कुणी हाक मारली नसेल तरीही स्वयंपुढाकाराने मदत करणे. ही परंपरा संपुर्ण मिझोरममधे आजही जोपासली जाते ज्याचा अनुभव मला आला. तो एक अद्भूत असाच अनुभव होता. आमची गाडी तेथे अडकलेली बघितल्यावर त्या गावातले सात आठ तरुण तेथे आले. त्यांनी आमच्यापैकी कुणालाही गाडीच्या खाली वगैरे उतरायला सांगितले नाही. खरे तर गाडीच्या खाली फारच जास्त चिखल होता. त्यांनी ड्रायव्हरशी बोलून गाडी लोटणे सुरु केले. गाडीच्या चाकांखाली बाजूने टोपल्यात भरून रेती आणून टाकणे सुरु केले. त्यामुळे गाडी नीट पुढे जायला लागली. त्यांनी ती गाडी ढकलत पुन्हा मुळ दिशेने वळविली नंतर ड्रायव्हरला पुन्हा त्या वळणावरून गाडी चालवायला लावली. यावेळी दरीच्या बाजूने ही सात आठ पोरे गाडी त्या बाजूने घसरु नये म्हणून उलट दिशेला ती ढकलत होते. बरोबर गाडीला दिशा देत त्यांनी त्या भयंकर वळणावरून गाडी पुढे काढून दिली. पुढे गेल्यावर आम्ही जरा गाडीच्या खाली उतरलो. फारच तणावाचा तो काळ राहीला होता. मी मागे बघितले तर ती पोरे आपले पॅन्ट गुडघ्यापर्यंत खोचून त्या चिखलात उभे राहून आमच्या मागच्या गाडीलाही त्याचप्रमाणे मदत करीत होती. मला त्यांच्या त्या कृतीचे फारच कौतुक वाटले आश्चर्य देखील वाटले. मी त्या बाबत माझ्या सोबत असलेल्या प्राध्यापकाला विचारले तर त्याने मला जे सांगितले ते जवळपास अविश्वसनीय होते. तो मला म्हणाला की सर, ही पोरे आता रात्री बारा वाजेपर्यंत या अश्या सर्व गाड्यांना मदत करतील. अश्याच प्रकारे. रात्री बारा नंतर ट्रॅफीक थांबेल मग हे आपापल्या घरी जातील. पुढे त्याने जे सांगितले ते महत्वाचे होते. तो म्हणाला की हे आमचे विशेष मिझो कल्चर आहे. तुम्ही संपुर्ण मिझोरम मधे कधीही कोणत्याही रस्त्यावर अडकले असाल तर तुम्हाला मदत करणारे लोक सगळीकडे अश्याच पद्धतीने मदत करताना दिसतील. त्यांना सांगावे लागत नाही, बोलवावे लागत नाही किंवा ते धन्यवादाचीही अपेक्षा करत नाही. कारण प्रत्येकच मिझो माणूस हा कधी ना कधी अश्या प्रकारची मदत करत असतो त्याला अशी मदत इतरांकडून मिळत असते. हा असा प्रत्यय मला पुढील रस्त्यावर देखील आला. एका ठिकाणी रस्त्याच्या लगत गाडी चिखलात फसली होती. बाजूने एका बाईकवर तीन तरूण जात होते. त्यांनी लगेच गाडी बाजूला लावली त्या गाडीला धक्का देऊन ती गाडी चिखलातून बाहेर काढली नंतर ते निघून गेले. कोणत्याही अडचणीच्या वेळी कुणालाही सहजच मदत करायला सरसावणे ही ती मिझोरमची परंपरा त्वालमंगीहा बघून मी फारच भारावून गेलो. माझ्या तीन दिवसाच्या मुक्कामात मला त्याचा अनुभव पदोपदी आला

मंडळी, मिझोरम हे आपल्या भारत देशातीलच एक राज्य आहे ही त्वालमंगीहा नावाची अत्यंत स्पृहणीय परंपरा राबविणारे मिझो लोक आपल्यासारखेच भारतीय आहेतयापेक्षा अधिक सांगणे लगे!!!





Comments

  1. त्वालयमहान
    त्वालेखमहान
    त्वानुभवमहान.....

    ReplyDelete
  2. मिझोरामच्या लोकांचा अनुकरणीय सद्गुण .
    प्रा.संजय पाटील
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय
    वाशिम

    ReplyDelete
  3. त्वालमंगिहा देशात राबवावी, अशी स्तुत्य परंपरा .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18