Posts

Article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सामर्थ्य या संवादास दे... दोन पिढ्यांमधील संवाद हे कधी सुसंवाद तर कधी विसंवाद असतात. हा नियम कोणत्याही ठराविक पिढ्यांच्या जोडीला लागू पडतो असे नाही. प्रत्येकच दोन पिढ्यांमधे हा प्रकार आढळतो. फरक पडतो तो केवळ विषयांचा, गरजांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा. बाकी विचारांचे वेगळेपण हे स्वाभाविकपणे राहतेच. असाच एका बाप व लेकी मधला पत्ररुपी संवाद मला वाचायला मिळाला. हे दोन्हीही संवाद एकमेकांना दिलेली उत्तरे नाहीत तर स्वतंत्र मते आहेत. मी या पत्रांचा वाचक म्हणून या दोन्हीही मतांच्या मधे उभा राहून माझे मत तपासून घेतोय. लेकीचा पत्ररुपी संवाद: बाबा, तुम्ही मला जरा समजून घ्यावे असे मला वाटते. मी आत मोठी झालेय हे प्रथम तुम्ही तुमच्या मनाला पटवायला हवे. मी आता अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाबा मला सोळावं वर्ष लागलंय. आता मला काही निर्णय माझ्या मनाने घेऊ द्या ना. मला ठाऊक आहे की तुम्हाला माझी फार काळजी वाटते आणि मला हे देखील ठाऊक आहे की ही काळजी तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच निर्माण होत असते. पण बाबा, मला आता तुमचे काळजी करणे बंधन वाटायला लागले आहे. मला तुम्ही मोबाईल फोन देणार नाही असे सा...

Article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है about कट्यार काळजात घुसली

Image
सूर निरागस हो... सुबोध भावेचा नितांत सुंदर चित्रपट -कट्यार काळजात घुसली - बघण्याचा नुकताच योग आला. अभिजात शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर उभा असलेला हा चित्रपट प्रत्येकाला भरभरुन आनंद देतो. सुरांची ताकद काय असते, संगीतकला ही किती श्रेष्ठ दर्जाची कला आहे आणि सुरांचे पावित्र्य टिकविण्यासाठी माणसाला मनाचे पावित्र्य जपावे लागते हे या चित्रपटातून ठळकपणे मांडले आहे. परंतू अभिजात शास्त्रीय संगीताची ताकद हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला जाणविते. हे अभिजात शास्त्रीय संगीत कळत असो अथवा नसो, त्याचा परीणाम प्रत्येकाच्या मनावर झालेला जाणवितो. त्यामुळेच एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटांमधे काही लोक आरडाओरड करतात किंवा विचित्र कॉमेंट्स करतात. परंतू येथे असे काही होत नाही. संपुर्ण चित्रपट वेगवेगळ्या चिजांनी, बंदीशींनी, आलापांनी, नाट्यपदांनी नटलेला आहे परंतू त्याचे सादरीकरण व सुरांची ताकद इतकी जबरदस्त आहे की प्रत्येकजण भारावून चित्रपट बघत राहतो आणि त्या सुरांच्या वर्षावामधे चिंब भिजून निघतो. चित्रपटातील पंडीतजींच्या निरागस सुरांनी जणू मूळ सा पासून सुरु झालेला हा चित्रपट त्यांच्या शि...

दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित माझा लेख "मामाचं हरवलेलं पत्र"

Image
मामाचं हरविलेलं पत्र साधारण तीस वर्षांपूर्वीचे एक चित्र: उन्हाळा जवळ यायला लागला की सर्वप्रथम जाणीव व्हायची ती म्हणजे परीक्षेची. परीक्षा आली की प्रत्येकाला तिचा ताण यायचाच. परंतू तो ताण घालविण्यासाठी आई-बाबांकडे एक छान गम्मत होती. ती गम्मत म्हणजे एक सुंदर स्वप्न. मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करायला लागली की आई म्हणायची, "बाळ आता छान अभ्यास करुन घे, मग परीक्षा आटोपल्यावर तुला मामाच्या गावाला जायचंय ना? मामाचं पत्र आलंय आणि त्याने आपल्याला बोलावलंय" हे वाक्य म्हणजे जणूकाही शब्दरुपी अमृत वर्षाच असायची. परीक्षेच्या धाकाने सश्यागत झालेलं मन त्या स्वप्नातील पूर्ण होणाऱ्या अनेक गोष्टींच्या केवळ आभासांनी पक्षागत उडायला लागायचं. परीक्षेचा तो अभ्यासाचा कालावधी त्या स्वप्नपूर्तीच्या विचारांनीच संपून जायचा आणि लगेच सारे भाऊ बहिण थेट पोहोचायचे आपल्या आजोळी. हे सारे तेथे पोहोचल्यानंतर तर काय गम्मत. एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास केवळ धमाल. कमी अधिक वयाची किमान दहा पोरे असायची. भल्या पहाटे उठणे, गावामधे त्या काळी नदी असायची आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातही ती वाहती असायची. नदीवर पोहाय...

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळीची सुटी...कुणाची? "चला, आता शाळेला सुट्टी लागणार. जरा निवांत मिळेल. सारखे रोज तेच तेच. सकाळी उठा , धावपळ करा. शाळेची तयारी... ती देखील साधीसुधी नाही. केव्हडाली ती स्कूल बॅग...धावत धावत निघा, केव्हडे ते होमवर्क. शाळेचे वेगळे, ट्युशनचे वेगळे. सोबतच वेगवेगळे प्रोजेक्ट करा. हे सारे प्रोजेक्ट शाळेच्या वेळात होतच नाहीत. किती मेहनत करावी लागते. त्यात दर महिन्याला परीक्षा असतेच. चांगला नंबर यायलाच हवा. आता दोन दिवसानी दहा दिवस मस्त आराम मिळू शकेल. शाळेला सुटी लागली की छान वाटते. मोकळा वेळ मिळतो. जरा वाचन वगैरे करता येईल..." ही सारी वाक्ये शाळेच्या व पर्यायाने अभ्यासाच्या अती व्यस्त कार्यक्रमाला कंटाळून सुटीचा आनंद घेऊ इच्छीणाऱ्या शाळकरी मुलांचीच राहू शकतात असा आपला समज राहू शकतो. परंतू ही सारी वाक्ये मी शाळकरी मुलांच्या तोंडून नव्हे तर त्यांच्या शाळेच्या आणि अभ्यासाशी पूर्णपणे बांधल्या गेलेल्या मुलांच्या आयांकडून ऐकली आहेत.. रोज सकाळी प्रभातफेरी आटोपून मी घरी येत असतो आणि त्याचवेळी लहान शाळकरी मुले शाळेत जात असतात. नेहमी दिसणारे एक चित्र मला विचारात टाकते. साधारण चौथ्या वर्...

My article published in Hindusthan Daily under थोडा है थोडे की जरूरत है

Image
वैचारिक आंदोलने.. सध्या आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरु आहेत. अचानक आपला समाज जागरुक झाला की ही मुळातच असलेली जागरुकता माध्यमांच्या मदतीने प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागली आहे हा देखील एका वेगळ्या चर्चेचाच विषय असू शकतो. परंतू ही एक चांगली नांदी आहे. जुन्या आणि नव्या विचारांच्या चर्चांमधूनच आपण भविष्यात एका चांगल्या आणि पोषक समाज व्यवस्थेकडे अग्रेसर होऊ. सध्याची मात्र एक फारच वेगळ्या प्रकारची संक्रमणावस्था प्रत्येकजण अनुभवतो आहे. प्रभावी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने एखाद्या विषयावरील दोन्ही बाजुचे विचार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या हे विचार प्रगटीकरण आपल्याला थोडेसे भडक, अतिरंजीत किंवा आत्मकेंद्री वाटत असले तरी हळूहळू या सर्व विचारमंथनाला एक दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विविध चर्चांमधून खरा समाजोपयोगी आधार निर्माण होऊ शकेल. अनेकांना सध्या या सर्व चर्चा वायफळ व वेळ वाया घालविणाऱ्या वाटत असतीलही परंतू त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपल्याला जाणवेल की या चर्चा विविध विषयांमधील लोकांचा सहभाग वाढवित आहेत. या सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढून देशाच्या विविध योजनांमधेही...

My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है today

Image
विधात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण मुंबई शहरात २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटामधील काही गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्या ब्रेकींग न्युज म्हणून ही बातमी दाखवित होत्या. शिर्षक सर्वांचे सारखेच होते, मुंबई लोकल बॉम्बस्फोटांच्या पिडीतांना अखेर न्याय मिळाला. साधारण नऊ वर्षांनंतर हा निर्णय करण्यात आला. अर्थात या निर्णयाला पुन्हा वरील कोर्टात आव्हान दिले जाणार आहेच. त्यामुळे शिक्षेवर अंतीम शिक्कामोर्तब केव्हा होईल हे नक्की सांगता येत नाही परंतू सध्या शिक्षा सुनावण्यात आली ही समाधानाची बाब आहे. या सर्व प्रकारात एक बाब आणखी घडली. ती म्हणजे, यापैकी काही गुन्हेगारांना अमरावतीच्या कारागृहात बंदीस्त ठेवण्यासाठी आणण्यात आले. अमरावतीला त्यांना त्यांनी केलेल्या निर्घण कृत्यासाठी बंदीस्त ठेवले जाणार आहे व या कृतीमुळे विध्यात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. या अमरावतीशी ज्यांचा घनिष्ट संबंध होता, अनेक वर्षे ते अमरावतीकरच होते असे एक गृहस्थ या बॉम्बस्फोटामधे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूला कार...

My article published in Hindusthan Daily under the column थोडा है थोडे की जरूरत है

Image
उदो बोला उदो!! कालपासून अमरावती शहरात अंबामातेचा-एकविरामातेचा -उदो बोला उदो- हा जयघोष सुरु झालाय. शहराच्या या ग्रामदेवतांचा जंगी उत्सव सुरु आहे. आता पुढील आठ-रात्री या शक्तीच्या प्रतीक असलेल्या मातांची मनोभावे पुजा केली जाणार, उपवास केले जाणार, पहाटे उठून अनवाणी मंदीरामधे जाऊन दर्शने घेतली जाणार, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलले जाणार, मातांची पुजा केल्यानंतर हाताला दोरे बांधले जाणार वगैरे वगैरे. एकंदरीत या शक्तीरुपी मातांवरील श्रद्धा जमेल तेव्हड्या तीव्रतेने व्यक्त करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार. अमरावतीच्या या श्रद्धास्थानांना मनोभावे भेटी देणाऱ्या भक्तांचे निरीक्षण केल्यास आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणविते, ती म्हणजे या ग्रामदेवतांचेच मानवी रुप घेऊन या पृथ्वीतलावर वावरत असलेल्या माता-भगिनींची संख्या या भक्तगणांच्या गर्दीत जास्त असते. विशेषतः शाळा, महाविद्यालयांमधे शिकत असलेल्या मुलींची तर संख्या फारच जास्त आढळते. एरवी पहाटे उठायला कंटाळा करणारी विद्यार्थिनी या नऊ दिवसांमधे पहाटे चार वाजता उठून, शुचिर्भुत होऊन, अनवाणी दोन किलोमीटर अंतर चालून मंदिरांमधे दर्शनाला येत...