थोडा है थोडे की जरुरत है @ 14.03.23

त्यांना सोडावे लागेल..

भगवतगीतेमधे विद्यार्थ्यांचे गुण सांगताना असे सांगण्यात आले आहे की त्याने आपल्या घराचा त्याग करून गुरु कडे शिक्षा ग्रहण करण्यास गेले पाहिजे. आताही अनेक मुले बारावीचे शिक्षण झाले की मोठ्या शहरात शिक्षणाकरीता जातात. आधुनिक काळात याचा एक आणखी नवा अर्थ लागू करण्याची गरज आहे. तो म्हणजे मुलांना आपण दिलेल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून त्यांना जगाचा थेट सामना करण्याकरीता तयार करणे. आई वडीलांनी जो कम्फर्ट झोन मुलांकरीता बनवून दिला असतो त्याच्या बाहेर पडल्याखेरीज किंवा आई-वडीलांनी त्यांना बाहेर पडू दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाचा खरा विकास होत नाही. त्याकरीता निश्चितच मनावर दगड ठेवायला लागतो. परंतू असे केल्याशिवाय जमत नाही. अश्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेल्या माझ्या मुलीच्या बाबतीत कालची सायंकाळ मला अस्वस्थ करून गेली. पण शेवटी मात्र हेच जाणविले की निर्णय योग्य होता.

सायंकाळी महाविद्यालयातून परत आलो आणि पुण्याहून मुलीचा फोन आला की तब्येत बरी नाही. सर्दी खोकला ताप देखील वाटतो आहे. ती पुण्यात रहात असल्याने सर्वात पहिल्यांदा मनात एच३एन२ चा विचार आला. माझे बापाचे मन स्वाभाविपणे धास्तावणारच. ती अमरावतीला म्हणजे तिच्या कम्फर्ट झोन मधे असती तर तिच्यासाठी विषय सोप्पा होता. बाबांच्या गाडीत त्यांच्या सोबत बसायचे बाकी सारी काळजी ते घेतील. औषधे, डॉक्टरशी बोलणे, थकवा वाटतो म्हणून इलेक्ट्रॉल पावडर हे सारे बाबा किंवा आईने सांभाळले असते. पण तेथे मात्र ती कम्फर्ट झोनच्या बाहेर होती. तिच्या नेहेमीच्या डॉक्टरकडे जाण्यास मी तिला सुचविले. मी निश्चिंत झालो. पण तसे सोपे सोपे व्हायचे नव्हते. ती ज्या डॉक्टरकडे नेहेमी जाते तो दवाखाना बंद. त्याच्या जवळचा दुसराही दवाखाना बंद. एकेका समस्येनंतर ती मला फोन करत होती मी तिला पुढे काय करता येईल ते सुचवित होतो. तेवढेच मी करु शकत होतो कारण ६०० किलोमीटर अंतरावरून अजून काय केल्या जाऊ शकते? त्यानंतर तिने तेथल्या मेडीकल स्टोअर्सवाल्या काकांना विचारले की आसपास एखादा दवाखाना आहे का? तो उत्तरला, आज आसपासचे सर्व दवाखाने बंद आहेत. प्रकृती बरी नसताना देखील माझ्या मुलीला स्वतः गाडी चालवित फिरावे लागत होते. मला त्याबद्दल वाईट वाटत असूनही मी त्या क्षणी काहीच करु शकत नव्हतो. त्यानंतर तिने गुगलचा आधार घेऊन डॉक्टरचा शोध घेणे सुरु केले. एक दवाखाना जवळच आहे असे तिला कळले. नंतर तिने त्या डॉक्टरांना फोन केला. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर पुन्हा थकवा आला असताना गाडी चालवत त्या दवाखान्यात गेली. हे सारे होत असताना स्वाभाविकपणे माझा जीव कासाविस होत होता. परंतू इलाज नव्हता. थोड्या वेळाने तिचा फोन आला, बाबा डॉक्टरांनी तपासले, औषधे दिली आहेत. आता मी घरी जाते. घरी जाताना तिला लागेल म्हणून तिनेच नारळपाणी, इलेक्ट्रॉल पावडर वगैरे खरेदी केली. आता घरी म्हणजे होस्टेलवर पोहोचल्यावर औषधी वेळेवर घेणे, वाफ घेणे इत्यादी साऱ्या गोष्टी तिलाच करायच्या होत्या. शिवाय स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवायचे, ताप बघायचा ही सारी कामे देखील करायची. सोबत मैत्रीणी असतात परंतू शेवटी तिचे तिलाच बघावे लागते. सायंकाळपासून ती औषधे घेऊन घरी पोहोचेपर्यंत माझा जीव मात्र खालीवर होत होता. मनात सारखा विचार येत होता, अमरावतीमधे असती तर तिला हे काहीच मी करु दिले नसते. कोणतेही पालक करु देणार नाहीत. परंतू हा पालकांनी तयार केलेला कम्फर्ट झोन कधी ना कधी आपल्याला बाजूला करून मुलांना आकाशात भरारी घेण्याकरीता सोडावेच लागेल. मान्य आहे की असा निर्णय पालकांकरीता सोपा नसतो कारण मुलांना लागणाऱ्या ठेचा या त्यांच्या पायाला लागतात परंतू त्याचे ओरखडे पालकांच्या मनावर पडत असतात. पण असे असले तरी मुलांना ठोकरा खाऊ देणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या भोवती तयार केलेला कम्फर्ट झोन दूर करणे गरजेचे आहे. प्रत्येकच मुलाला घरापासून दूर ठेवणे शक्य होऊ शकत नाही. परंतू त्याला जगाचे टक्के टोणपे खाऊ देणे गरजेचे आहेच. कारण एका विशिष्ट वयाच्या पलीकडेही जर हा कम्फर्ट झोन आपण काढला नाही तर मुलांच्या व्यक्तित्वाचा विकास होऊ शकणार नाही त्यानंतर पुढील जीवनात येणारी छोटीशीही कठीण परीस्थिती त्यांना सहन करणे जमणार नाही ते कोलमडून जातील

म्हणूनच आधुनिक काळात पालकांनी मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावेच परंतू पाठीशीच रहावे, त्यांच्या सोबत प्रत्येकवेळी चालण्याचा प्रयत्न करता त्यांना त्यांचे चालू, पडू, उठू पुन्हा चालू द्यावे. होय ना?





Comments

  1. Kyy baat avi bhayyya mi tar bhaukak zalo malach tuza article vachyyavar khup emotional zalo. Evda motha manus tu asa kass rte sahan jartos Arre teecha baba ahes re avidada tu .kiman punne la jaun teeka bhtun yya cha na atta tari Kharach re avibaba kiti kevil Ani avshta zali teech mala vachnach ki kassetati vatle. Kiti guntaguni h ahe re apllya muipasun yewdh ddor asane kiman atta tsri char atth divas ithe bolaun ghe. Dada mala mahit ahe tu tuza baban ha Ani Aaicha comfort zon madhech rahila na re! Maza kadun kharch he vachle pan man kadavis zal maz vidada ja Ani gheun ye teela chhar divas teela teecha aaijaval Tuza motha bhau mhnun tula request karto Mi ass opinion dile .soory for saying this Avidada

    ReplyDelete
    Replies
    1. No problem… I will bring her to Amravati. But I am proud that when I have asked her whether I shall come to Pune, then she said that she is able to handle her and that was exactly I wanted. I was also restless to see her condition but… that is the point ultimately. Though being her father I am always with her but she must learn to lead her life by herself. I agree with your emotions in totality.

      Delete
  2. Replies
    1. अगदी बरोबर सर

      Delete
  3. अगदी खरय

    ReplyDelete
  4. 100% बरोबर. सर, आता कशीये मुलगी? मी पुण्यातच सृजना सोबत वारजेला रहायला आहे. काही अडचण असेल तर हक्काने कळवा, अगदी अर्ध्या रात्री सुद्धा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18